पान:गोमंतक परिचय.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ४ थें पुढे १९१७ त प्रांतिक कौन्सिलच्या निवडणुकी जाहीर झाल्या. पूर्वकालीन परंपरेवर विश्वासून नव्या काविजादीत उभे राहिलेल्या निस्ती उमेदवारांचा तेथे प्रचंड अशा बहुमतानें पराजय झाला. त्याच वेळी आमच्या ख्रिस्ती बंधूंना समजलें की, हिंदुसमाज मेला नाही; त्याच वेळी हिंदूंना समजले की, आपल्या उद्धाराचा मार्ग मोकळा झाला. _दरम्यानच्या काळांत हिंदुमत, प्रभात, भारत, इत्यादि हिंदूंनी चालविलेली, हिंदूंकरतां उत्पन्न झालेली, व हिंदूसाठी मतप्रसार करणारी वर्तमानपत्रे निघाली. मडगांव, पणजी, म्हापशें, फोंडे, इत्यादि ठिकाणी शाळा, वाचनालये, व्याख्यानमाला, इत्यादि रूपाने आजवरचा दाबून राहिलेला, जन्मभूमीचे ऋण फेडण्याचा हिंदूंचा उत्साह उसळत्या जोमाने बाहेर पडला. ____गोव्याच्या तिजोरीवर प्रचंड दडपण पाडणारे बनाव पोर्तुगालांत होऊ लागले व त्यांना हिंदूंनी स्वतः निवडून दिलेले पार्लमेंटचे सभासदच कारण झाल्याचेहि वर्तमान आले. दुसऱ्याच निवडणुकीत त्या सभासदांचा प्रचंड बहुमतानें पराजय झाला. नवीन काबिजादीमध्ये तर ख्रिस्ती उमेदवारांना उभे राहाण्यालाहि धीर होईना. म्युनिसिपालिटया, कायदेकौन्सिलच्या निवडणुकी, साऱ्या हिंदूंच्याच मताप्रमाणे बनूं लागल्या. आम्हांला अमूक पाहिजे,' “ आमच्या मागण्या अशा अशा आहेत ' असें सांगण्यास वीसच वर्षीमागें ज्या हिंदूंनां हिय्या होत नव्हता, त्याच हिंदूंकडे, आजला त्यांची मते समजून घेण्यासाठी, ख्रिस्ती पुढारी खेपा घालीत आहेत. स्वत:च्या खास बहुमताच्या, नव्या काविजादीतच, ज्यांना दुसऱ्यांच्या ओंजळीनें पाणी प्यावे लागत होते, तेच आज जुन्या काविजादीतील राजकारणांतहि प्रामुख्याने भाग घेऊन बहुमत आपल्या बाजूचे करूं शकतात. राजकीय वर्चस्वाचे दुसरे गमक म्हणजे सरकारी नोकऱ्यांतून प्रमाणशीर भाग मिळणे हे होय. इ. स. १९०० त सरकारी नोक-यांतून खालच्या जागा व त्याहि अगदी थोड्याच, हिंदूंच्या वाट्याला आल्या होत्या. लिसेवांतील मराठी भाषेचे प्रोफेसर, कोमार्कातील जज्जकचेरीच्या कारकुनांच्या जागा व रेसेवेदोरच्या कांहीं जागा, पोस्ट खात्यांतील कांहीं जागा, इतकेच काय तें हिंदुसमाजाचे भांडवल होते. व हीच स्थिति १९१० साली होती. मात्र जमीनमोजणी खात्यांत व पब्लिक वर्कस खात्यांत नुकताच प्रवेश मिळत होता. रिपब्लिकन समतेच्या १९ वर्षांत हिंदूंनी आपल्या बुद्धिमत्तेच्या व कर्तबगारीच्या जोरावर, जाहीर परीक्षा देऊन,