पान:गोमंतक परिचय.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय नौबतच होती. त्या बातमीने हिंदूनां असा इशारा दिला की, हिंदूंचे दसरे बंद होण्याचा काळ यापुढे नष्ट झाला आहे, त्या नौवतीने असे आश्वासन दिले की, इतःपर तुम्हांला केवळ धर्मभेदामुळे कोणत्याच जागी मज्जाव राहिला नाही; त्या आकाशवाणीने असे सांगितले की, सासष्ट प्रांतांतील देवळे एका रात्रीत धुळीस मिळविणारी घातकी धर्मसत्ताच धुळीस मिळाली आहे; कुंकळ्ळीच्या प्रजेला तुडविणारी, त्यांची घरेंदारे जप्त, नव्हे भस्मीभूत करणारी, ती उन्मत्त राजसत्ता ४ ऑक्टोबरच्या तोफांच्या आगीत स्वतःच भस्म झाली, असेंच त्या दवंडीने सांगितले; हजारों लोकांनां जबरदस्तीने पकडून बाप्तिस्मा देणारी ती पाशवी सत्ता, शेकडों अर्भकांची मातांपासून ताटातूट करणारी ती सैतानी सुलतानशाहो, इंक्विझिसांवाच्या नावाखाली शेंकडों कुलस्त्रियांची अब्रू घेणारी ती बेशरम पाद्रीशाही कोसळून तिचा भुसा झाल्याची ती द्वाही होती. हिंदुसमाजानें तो दिवस अवर्णनीय उत्साहाने साजरा केला. रिपब्लिकनें राजकीय स्वातंत्र्य दिले होते, पण हिंदूंनी त्याकरिता रिपब्लिकचा जयजयकार केला नव्हता; रिपब्लिकनें समतेचा घोष केला होता, परंतु हिंदूंनी केलेल्या जयघोषाचें तेंही कारण नव्हते; रिपब्लिकने जित व जेते हा भेद नष्ट केला होता, पण तेंहि हिंदूंच्या उत्साहाचे कारण नव्हतें; रिपब्लिकन पुढाऱ्यांनी वसाहतींना प्रांतिक स्वातंत्र्य देण्याची योजना जाहीर केली होती,परंतु ते देखील हिंदूंच्या अनिर्वचनीय आनंदाचे कारण नव्हते. राजधर्माच्या नावाखाली, हिंदूंच्या देवालयांना घालण्यात आलेले कायद्याचे लंगर तुटून पडल्याच्या आनंदाचा तो जयजयकार होता; कॅथोलिसिझमच्या पांघरुणाखाली, घरच्या भेद्यांनी माजविलेल्या भीषण जुलमाच्या अखेरच्या आरोळीमुळे उद्भवलेला तो स्वयंस्फूर्त जयघोष होता. खंडित मूर्तीच्या, उच्छेदित देवालयांच्या, भ्रष्ट धर्मभूमीच्या अर्चाशुद्धीच्या समयीं हिंदुमात्राच्या हृदयांतून निघालेल्या आनंदाचा तो जयघोष होता. १९११ च्या निवडणुकीतच ह्या बदललेल्या परिस्थितीचे माप हिंदूंच्या प्रतिपक्षाच्या पदरांत पुरोपूर पडले. सत्तेचा बागुलबोवा, पैशाचे पाठबळ, आणि पाद्रींकडून पुकारली गेलेली बहिष्काराची दहशत इत्यादि कशाचाहि उपयोग न होतां हिंदूंनी पाठबळ दिलेला प्रतिनिधि पार्लमेंटांत पोंचला. हाच हिंदूंचा राजकीय स्पर्धेतील पहिला विजय होता,