पान:गोमंतक परिचय.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ४ थें येथे हिंदुसमाजाने 'सार्वजनिक सभा' या नावाची एक संस्था काढली होती खरी, पण आपापसांतील दुहीमुळे व अंशतः बेफिकीर वृत्तीमुळे, ती लवकरच वंदहि पडली. १९०१ पासूनच हिंदुसमाजानें पोर्तुगीज शिक्षणाकडे थोडे फार लक्ष दिले होते. हिंदुपुस्तकालय ही वाङ्मयविषयक संस्थाहि त्यापूर्वी “उत्पत्ति, स्थिति व लय” पावली होती. बंगालची फाळणी व तिच्यामुळे उत्पन्न झालेली अभिनव चळवळ, महाराष्ट्रीय वर्तमानपत्रांतून गोमंतकीयांच्या कर्णपथावर आदळली. सारा गोमंतक त्या वेळी खडबडून हालला. पणजी येथे पूर्वीच्याच हिंदु पुस्तकालयाच्या इमारतींत, गोवा-हिंदु-क्लबाची स्थापना झाली. प. वा. डॉक्टर पुरुषोत्तम वामन शिरगांवकर हे गोव्यांत स्थायिक झाल्याला नुकतीच दहा वर्षे झाली होती. डॉक्टरसाहेबांचा आत्मा हिंदूंच्या असहाय व दुबळ्या स्थितीमुळे जळफळत होता. परंतु या स्थितींतून समाज कसा वर निघेल याचा मात्र नीटसा बोध त्यांना झाला नव्हता. तरीपण त्यांचे एतद्विषयक चिंतन अहनिश चाललेलेच होतें. गोवा-हिंदु-क्लब काढण्यांत त्यांचेच परिश्रम विशेष होते. गोवा-हिंदु-क्लबाच्या स्थापनेच्या मागोमाग साऱ्या गोमंतकभर वाचनालयेच वाचनालये उघडली गेली. पुढे स्वदेशीची लाट आली, हिंदु-क्लबामार्फत स्वदेशीचे छोटेसें दुकान उघडले गेलें व स्वदेशीच्या शपथाहि भराभर घेतल्या गेल्या. गोव्यासाठी, गोमंतकांतील हिंदूंसाठी काही तरी झाले पाहिजे, काही तरी केलें पाहिजे, ही जाणीव याच वेळी विशेष जोरानें गोमंतकीयांत दिसू लागली. जवळ जवळ समकालीनच अशी या जाणीवेला दोन कारणेहि मिळाली होती. पारोडेंच्या दसऱ्याची बंदी आर्चविशप दों व्हालेति यांनी करविली व १९०७ च्या पोर्तगीज प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याने हिंदूंना प्राथमिक शिक्षकवर्गात शिरण्याचा मज्जाव केला. पणजी येथे प्रचंड जाहीर सभा भरून त्या कायद्याचा निषेध केला व तद्विरुद्ध वरिष्ठ सरकारांत तार, तक्रार अर्ज, इत्यादि प्रयत्न करण्यांत आले. १९०८ सालीं पोर्तुगालांत राजे दों कालुश यांचा भरदिवसा आणि भररस्त्यांत क्रांतिकारकांनी बळी घेतला. आणि पुढे दोनच वर्षांनी मोनार्कीचा अंत होऊन धार्मिकदृष्टया समदृष्टि असें रिपब्लिक स्थापन झाल्याची सुवाती आली. हिंदु समाजाला ती बातमी आकाशवाणीप्रमाणे भासली. चारशे वर्षांचा धार्मिक जलूम मेला, नाहीसा झाला, पुढे तो उद्भवणे सुतराम शक्य नाही, असे सांगणारी ती आकाशवाणी होती. हिंदू हो, इतःपर तुम्ही स्वतंत्र झालांत, तमच्या प्रगतीला आतां कोणतेंच बंधन राहिले नाही, अशी दवंडी पिटणारी ती धर्मराजाची