पान:गोमंतक परिचय.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय दस्तऐवजावर पत्नीची सही कायद्यानेच आवश्यक ठरविली आहे. अर्थात् तद्भावी सर्व करारच निराधार बनतो. त्याचप्रमाणे पितृधनावर देखील कन्येचा अधिकार पुत्राइतकाच असतो. हा हक्क बजावून पितृगृहाची इस्टेट नेणाऱ्या मुली मात्र अद्याप फारशा दिसून येत नाहीत. ह्या हक्कांमुळे, पितृगृहीं असो किंवा श्वशरगृहीं असो, स्त्रीवर्गाची स्थिति बरीच समाधानकारक असते. सासूशी पटत नाही म्हणून, नवऱ्याला नको म्हणून, वांझ निघाली म्हणून, फार तर काय, पण हुंडा भरपूर न मिळाल्याने अथवा वाईट चालीची निघाली म्हणून, एक बायको टाकून दुसरी केल्याची उदाहरणे, गोमांतकीय अभिजातवर्गात आजवर दोनचारांपेक्षा अधिक नाहींत. वास्तविक पाहातां, उपरोच्चारित हिंदु कायद्याने, बायको वांझ निघाल्यास किंवा रोगी असल्यास, दुसरे लग्न करावयाला पुरुषांना मुभा दिलेली आहे. परंतु व्यवहारांत तिचा उपयोग करण्याची पाळी आली असतांहि तसा फायदा घेणे कमीपणाचे मानण्यात येते. इतका दर्जा व चांगली वागणूक स्त्रीवर्गाला मिळते. व ती हिंदु समाजांत,अजूनहि कोठे कोठें रूढ असलेल्या समायिक कुटुंबांत देखील मिळते, हे त्यांत विशेष आहे. राजकीय दर्जा व सार्वजनिक कार्य:-इ. स. १८३५ पर्यंत तरी हिंदूंना राजकीय रीत्या कायदेशीर असें अस्तित्वच नव्हतें. 'हे जुलुमांच्या जंत्रीवरून स्पष्ट दिसून आलेच आहे. आणि त्यानंतरच्या काळांत झाले तरी, मतदानाचा अधिकार, मग तो पार्लमेंटांतील प्रतिनिधीसाठी असो, किंवा जुन्या काविजादीतील म्युनिसिपालिटयांसाठी असो, पण तो सार्वत्रिक असा, फारच थोड्या प्रसंगी झाला होता. कधी कधीं कर भरण्याच्या लायकीमुळेहि तो मिळाला होता. त्याचे सार्वकालीन गमक म्हणजे पोर्तुगीज लिहितांवाचतां येणें हेच होते. अर्थात्च पोर्तुगीज शिक्षणांत बराच मागे असलेल्या हिंदु समाजानें, तत्कालीन परिस्थितीत पढारलेल्या ख्रिस्ती समाजाकडे, राजकीय स्पर्धेत आपले महत्त्व प्रस्थापित करणे ही अशक्यप्रायच गोष्ट होती. मतदानाचा प्रसंग येतांच लोयोल पक्षीय किंवा कोश्तपक्षीय,पण ख्रिस्ती पुढाऱ्यांनी चिट्ठी पाठवून एखाद्या श्रीमंता'ला किंवा पढारी म्हणविणाऱ्या लटपटया “होयबा” हिंदूला बोलावून न्यावे व तो सांगेल तेथें इतरांनी मत द्यावे, हाच प्रकार जवळ जवळ साऱ्या सनदशीर राज्यपद्धति. विभागांत चालला होता.हिंदूंच्या स्वतंत्र अशा काही तरी आकांक्षा असू शकतात, ही कल्पनाच मुळी फार थोड्यांच्या लक्षात आली होती. व त्यांना ती छातीठोकपणाने ख्रिस्ती पुढाऱ्यांसमोर मांडण्याचा हिय्याहि झाला नाही. मध्ये पणज