पान:गोमंतक परिचय.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ४ थें कीयांना नाटके-कादंबऱ्यांतूनच काय ती झालेली आहे. अविवाहित स्थिति पतकरणे भाग पडण्याइतकें शिक्षण अद्याप गोमंतकीय स्त्रीवर्गाला लाभलें नाहीं. लिसेवचे शिक्षण पुरे झाल्याशिवाय विवाह नाकारणारे तरुण आतांशा कोठे दिसूं लागले आहेत. बाकी त्यांतहि कांहींच नवल नाही. कारण, गोमंतकीय हिंदुसमाज पोर्तुगीज शिक्षणाकडे वळू लागल्याला अद्याप पुरतीं तीस वर्षेहि झालेली नाहीत, हे पुढे शैक्षणिक परिस्थितीच्या विचारांत दिसून येईलच. खालच्या वर्गात मात्र वधूचा बालविवाह, पण वराचा प्रौढ वयांत विवाहच रूढ आहे. दक्षिणी ब्राह्मण घराण्यांतूनहि वधुवरांची वयोमर्यादा फारशी वाढलेली नाही. मध्यम स्थितींतील कुटुंबांतून हुंड्याचे मान किमान एक हजारापासून कमाल अडीच हजारांपर्यंत असते. यावर हंडा घेणारी-देणारी कुटंबें केवळ जन्या मोठमोठ्या घराण्यांतून किंवा नव्या नुकत्याच संपन्नावस्थेत येणाऱ्या कांहीं थोड्याशा वर्गातच दिसून येतात. परंतु अशा दर्जाची कुटुंब गोमंतकीय हिंद समाजांत अगदी थोडीच आहेत. आणि या कुटुंबांतनहि हुंडा घेतला जातो तो पांचसहा हजारांच्या आंतच असतो. अशिक्षित व खालच्या कुणबी वगैरे लोकांतून व कित्येक दक्षिणी ब्राह्मणांतून उलट हुंडा घेण्याची चाल दिसते. कुणवी वगैरे समाजांत त्याला “ मायपाना” अशी संज्ञा आहे. विहिणींचा रुसवा, सानपानासाठी नवरदेवाचें अडणे, विवाहसमारंभांतील “ विहिणींचा कलकलाट ” इत्यादि दृश्य गोमंतकांत आजला तरी कौतुकास्पद चिजा आहेत. त्याच प्रमाणे भुकेकंगालांप्रमाणे जेवणासाठी वधूपक्षाकडे घालण्यात येणारी इतर ठिकाणची हुल्लड गोमंतकीयांना कशीशीच वाटते. आग्रहाचें व अगत्याने केलेले आमंत्रण असल्याशिवाय वरपक्षीय व-हाड्यांपैकी एकही इसम वधुपक्षाकडे जेवावयाला जावयाचा नाही. स्त्रियांची परिस्थितिः-'हिंदु स्त्रियांची कायदेशीर दुर्दशा ' गोमंतकांत तरी अनुभवास येत नाही. ख्रिस्ती समाजाचा सहवास व “ कोड नेपोलियन " यांतील स्त्रीवर्गाचे हक्क राखणारी कलमें; तसेंच खास हिंदूंसाठी म्हणून इ. स. १८५४ त झालेला व १८८० साली सुधारलेला पोर्तुगीज कायदाहींच याची कारणे आहेत. गोमंतकीय स्त्री ही आपल्या पतीची खरीखुरी अोगी असते. लग्न होतांच पतीच्या इस्टेटीचा अर्धा वांटा तिच्या मालकीचा बनत असतो. पत्नीच्या कायदेशीर अशा लेखी संमतीशिवाय, पतीला महत्त्वाचा असा व्यवहार करतांच त नसतो. इस्टेट विकावयाची असली, कर्जवाम काढावयाचे असले, तर होणाऱ्या