पान:गोमंतक परिचय.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय देवज्ञ ब्राह्मण वर्गात सोन्यारुप्याचें, मिन्याचे, जडावाचे वगैरे काम, तुटपुंज्या शस्त्रसामुग्रीनेंहि इतकें उच्च अभिरुचीचे होते की, मुंबईच्या जव्हेऱ्यांच्या कारखान्यांत देखील या सामानाला मागणी असते. इतकेच नव्हे तर इकडचे बरेच दैवज्ञ त्यांच्या कारखान्यांत कामाला नेण्यांत येतात, तरीपण आर्थिकरीत्या हिंदुसमाज हा ख्रिस्ती समाजापेक्षा खालावलेलाच आहे. बाटाबाटीच्या काळापासून झालेले जुलूम, निरनिराळ्या काळी निरनिराळ्या वर्गाच्या हाती पुढारीपण गेल्यामुळे झालेली हानि धर्मातराच्या भीतीमुळे असो, सोयीच्या अभावामुळे असो किंवा सोंवळेपणाच्या धास्तीमुळे असो, पण राज्यकारभारांत प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या पोर्तुगीज भाषेच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करण्याचे आत्मघातकी धोरण, इत्यादि अनेक कारणामुळे हा समाज बरीच वर्षे इतर समाजाचें कुरणच बनला होता. रेनाइश ( खास पोर्तुगालमधून आलेले) काशतीस ( येथे स्थायिक बनलेले ) लूझोइंडियन व कानारी हे जरी आपआपसांत कितीहि भांडले तरी, “ रेड्यापाड्यांचे झुंझ झाडावर काळ " या कोंकणी म्हणीप्रमाणे शेवटी त्यामुळे नुकसान व्हावयाचें तें हिंदु समाजाचेंच, असा काळ गोमंतकांत निदान तीन सव्वातीन शतकें तरी चालू होता; त्याचा परिणाम म्हणून किंवा बदललेल्या परिस्थितीत योग्य वेळी शीड फिरवून निरनिराळ्या वेळी ख्रिस्ती समाजांत माजलेल्या द्वंद्वांचा फायदा घेण्याइतका दूरदर्शीपणा न दाखविल्याचे प्रायश्चित म्हणून, आजची आर्थिक स्थिति हिंदुसमाजाला प्राप्त झाली आहे. विवाहवयोमर्यादा व हुंडा वगैरे-पांढरपेशा समाजांत बालविवाह बंद झाल्याला बरीच वर्षे झाली. रेजीश्तसिव्हिलच्या कायद्याचे वयोमर्यादेचे बंधन हिंदना लागू करण्यांत आलेले नसले, तरी वधुवरांच्या वयाची मर्यादा अभिजात हिंदुसमाजांत बरीच वाढलेली दिसते. आजला वधूचे वय १५ ते१८ च्या दरम्यान असते व वराचे २० ते २५ पर्यंत वाढले आहे. १८ च्या वरची वधु व २५ च्या पलीकडचा नवरदेव ह्या गोमंतकांत दुर्मिळ वस्तु आहेत. युरोपियन लोकांचा व युरोपियनाइज्ड खिस्त्यांचा सहवास, मुलांमुलींचे शिक्षण व कांहीं अंशी हंड्याची अडचण ही कारणे देखील वय वाढवावयाला कारणीभूत झाली असावी. वयोमर्यादेच्या बाबतीत हिंदूंना मनुस्मृति लागू करण्यात येत असल्या मुळे, बालवयांत लग्न करावयाला कायद्याने त्यांना मुळीच आडकाठी नाही. विवाहाची जुळवाजुळव अजूनहि पालकांकडूनच होते. प्रीतिविवाहाची ओळख गोमंत