पान:गोमंतक परिचय.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ४ थे रागरागिण्याचे स्थल ज्ञानहि असलेले बरेच लोक खेडोखेडी मिळतात. ग्रामोफोनच्या द्वारें फुरसदीचा वेळ घालविणारे हौसीजन इकडे पुष्कळच आढळतील. . नाटयकलानिपुण असा नटवर्ग गोव्यांत उत्पन्न होऊ शकतो, हे बलवंत व रंगबोधेच्छु नाट्यसमाज यांतील रा. दीनानाथ रा. सावकार इ. गोमंतकीय प्रसिद्ध नटांच्या कामगिरीवरून दिसून आलेच आहे. बाकी आमची ही नाटयप्रियता महाराष्ट्रीय नाटकमंडळ्यांच्या तरी पूर्ण परिचयाची आहे. कठीण अशा आर्थिक परिस्थितीतहि गोमंतक हा नाटक मंडळ्यांचा पूर्वापार आश्रयदाताच आहे. गायक समाजांतील गायिकांशिवाय इतर हिंदु स्त्रीवर्गात मात्र शास्त्रोक्त गायनाचासंगीताचा मुळीच प्रसार झाला नाही म्हटले तरी चालेल. चित्रकला, फोटोग्राफी, वास्तुकला या दृष्टीने पुष्कळ गोमंतकीय महाराष्ट्राच्या परिचयाचे आहेत. मूर्तीचें काम पाहावयाचे झाल्यास, गणेशोत्सवांत पणजी, म्हापशें, डिचोली, इत्यादि ठिकाणचे मूर्तिकार शिक्षण मिळाले नसतांहि इतक्या चांगल्या मूर्ति बनवितात की, त्या पाहून तज्ज्ञ पोर्तुगीज युरोपियनांनीहि त्यांची वाहवा केली आहे. व्यापारधंदा:-व्यापारधंद्यांत हिंदु लोकांचा हात बराच मोठा असतो. गोमंतकांतील नारळ, मीठ, इत्यादिकांचा निर्गत व्यापार चारदोन गुजराथी व पांचदहा घांटवाले व्यापारी सोडले तर सारा गोमंतकीय हिंदूंच्याच हाती आहे. त्याचप्रमाणे वस्त्र जिनसाची आयात बहुतांशी त्यांचीच असून खाद्यपेयादि मालाच्या आयातीपैकी जवळजवळ दोनतृतीयांश व्यापार हिंदु लोकच करतात. त्यांतल्यात्यांतहि पाहावयाचे झाल्यास, व्यापारांत वैश्यवर्गाखालोखाल माध्व सांप्रदायी सारस्वत ब्राह्मण पिढीजात आहेत. पूर्वी तर दीव सारख्या व्यापारी गुजराथी प्रांतांत देखील गोमंतकीय सारस्वत ब्राह्मण व्यापारा निमित्त गेलेले होते. कलाकुसरीचें, सुबक व उच्च अभिरुचीचे फर्नीचर करणारे सुतार गोमंतकांत हिदूशिवाय फारसे सांपडावयाचे नाहीत. शिसवी लाकडावर देवादिकांच्या मूर्ति, निरानराळे देखावे वगैरे खोदणारे सतार इकडे बरेच आहेत. त्यांचा हा माल फार महाग पण सुबक असल्याने युरोपियन लोक पोर्तगालांत घेऊन जातात. मंबईच्या मार्केटांत पुष्कळदां दिसणारे कंभारकाम कुंडया, स्ट्रलें, तुळशी, दिवाणखान्यांत शोभेसाठी ठेवावयाचे खांब, सुंदर व चित्रविचित्र आकाराचे खुजे, ही सर्व डिचोलीच्या हिंदु कुंभारांच्या हातची असतात. रंगीत लांकुडकाम करणारे चितारीहि गोव्यांतील हिंदुसमाजांत बऱ्याच ठिकाणी आहेत.