पान:गोमंतक परिचय.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. आरोवा या उभय गांवांत पूर्वी किल्ले होते. शिवाय इतिहासप्रसिद्ध हळर्णचा किल्लाहि याच नदीतीरी पेडणे महालांत आहे. कोलवाळ येथे अलिकडे एक बुद्धाची मूर्ति व कांहीं तत्कालिन अवशेष सांपडले आहेत. मांडवी नदीः–ही गोव्यांतील नद्यांत प्रमुख असून तिच्या गणगोताचा विस्तारहि बराच मोठा आहे. गोव्याच्या ईशान्य कोपऱ्यांतील भीमगडांत उगम पावून व सत्तर प्रांत मधोमध दक्षिणोत्तर चिरून, भादय या नांवाने ती गांजेपर्यंत येते. येथेच तिला खाऱ्या पाण्याची जोड मिळते. पुढे अनेक नद्यांचे पाणी पोटांत घेत ती पिळगांव येथे येते. येथे तिचे पात्र पुष्कळ रुंदावते व त्यांत जुवें, कुंभारजुवें कुलालद्वीप, दिवाडी, दिपावती, चोडणे, चूडामणी, आखोडा, खोरजुवें इत्यादि वेटें बनून रायबंदर बंदरानजिक सारे फाटे एकत्र होऊन पणजीला कक्षेत घेतल्यावर आग्वाद व काब या दोन टोकांतून भव्य व मनोहर स्वरूपांत ती आरबीसमुद्रास मिळते. सांखळीची नदी, डिचोलीची नदी, म्हापशेची नदी, रगडो, दुधसागरची नदी इत्यादि प्रवाह इच्या गणगोतांतील आहेत व भाणस्तार येथून निघालेल्या माशेलांतील नदी या नांवाच्या फांटयाने हिने अघशी नदीस मिठी मारली आहे. गोमंतकाची जुनी राजधानी गोवें शहर व नवी राजधानी नवीन गोवें (पणजी ) ह्याच नदीच्या दक्षिण तीरावर आहेत. नारवें येथे ह्या नदीत एक संगम होऊन ती दक्षिणवाहिनी होते. तेथें जन्माष्टमीची जत्रा भरते. खंडेपार येथे दुधसागरच्या नदीवर एक दगडी पूल आहे तो फारच सुंदर आहे. तसेंच भाणस्तारच्या फांटयावरहि एक लोखंडी पूल गेल्या साली बांधला आहे. नदीमुखाशी बारदेश प्रांतांत " रेइज मागुश" चा किल्ला व आग्वादचा किल्ला व दक्षिण तीरावर काबचा राजवाडा आहेत. - अघशी ऊर्फ जुवारी नदीः-ही गोमंतकांतच हेमाडबासे व अष्ट्राग्रहार प्रांतांत उगम पावून सांगें, केपें, फोंडे, सासष्ट, तिसवाडी व मुरगांव या कोसेल्यांना कुरवाळीत मुरगांवच्या आखातांत मांडवी नदीच्या मुखाजवळच समुद्रप्रवेश करते. मुरगांवचा किल्ला व रायतूरचा किल्ला हे याच नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर आहेत. मुरगांव, रायतुर, कुठाळ, कुडचडे ही बंदरें दक्षिण तीरावर व अघशी-फोंडा व कवळे येथे जावयाचें दुर्भाट बंदर, बोरी ही उत्तर तीरावर आहेत. सावर्डे येथे ह्या नदीवर रेल्वेचा उंच दुमजली पूल सुमारे १०० मीटर लांबीचा आहे. वरच्या मजल्यावरून आगगाडी, खालून खटारे वगैरे