पान:गोमंतक परिचय.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय मानानें इकडची हिंदूंची. घरे किती तरी स्वच्छ व टुमदार दिसतील. गोमंतकांतील घरांच्या तोडीला उतरलीच तर दक्षिण कोंकणांतीलघरे मात्र उतरतील.त्याचप्रमाणे महाराष्ट्रांतील सातारा शहरहि इतर शहरांच्या मानाने गोमांतकीय शहरांइतकेच स्वच्छ दिसते. जुन्या काबिजादींतील हिंदूंची घरें बरीचशी ख्रिस्ती वळणावर गेलेली दिसतात. परंतु नव्या काविजादीतून दर पंधरावीस वर्षांनी एखादें तरी बंड उद्भवून लूटफाट होते.लोकवस्तीहि विरळ असल्यामुळे ही घरे बांधतांना, सोयीपेक्षा सरक्षिततेकडेच साहजिकच विशेष लक्ष द्यावे लागते. हिंदूंची घरें जर निराळींच ओळखायची झाली,तर चौकाची घरे ती सारी हिंदूंची, असे म्हणता येईल.खाणेपिणे सामान्यतः इतर ठिकाणच्या हिंदूंप्रमाणेच असतें. फरक एवढाच की, येथें खाद्य पदार्थातून नारळाचा भरपूर उपयोग होत असतो आणि घांटावर किंवा देशांत नारळ तादृश मिळत नसल्याने, त्याऐवजी दुधातुपाचा उपयोग होतो. डाळभात, भाजीपाला, ताजे व सुके मासे, हेच मुख्य अन्न असते. केवळ भाकरीवर राहाणारें कुटुंब इकडे मिळणे अशक्यप्राय आहे. पोर्तुगीजांच्या कृपाप्रसादामुळे, सृष्टिनिर्मित ग्रामसूकररूपी भंगी इकडे फार आहेत. अर्थातच स्वच्छतेची तेवढीच काळजी कमी करावी लागते. सूकर वर्गाचा दुसरा फायदा म्हणजे खताकडे त्याचा मळ फारच उपयोगी पडतो. म्हणून त्यांची घाणहि माजत नसते. महाडच्या "चवदार ” तळ्याचें बेंचव पाणी पिण्याचे भाग्य प्रस्तुत लेखकाला पंधरवडाभर मिळाले होते. तशा प्रकारचे पाणी इकडे खालचा वर्ग देखील वापरांत आणणार नाही.. नदीनाल्यांचे पाणी वापरण्याचे घातकी खूळ इकडे केवळ कर्यादीत ( सह्याद्रीच्या लगतच्या भागांत ) मात्र प्रचलित आहे. तळ गोमंतकांत तें मुळीच नाहीं म्हटले तरी चालेल. कारण भरती ओहोटीमुळे तेथें सारे प्रवाहच मुळी खाया पाण्याचे असतात. क्वचित् स्थळी त्याचा उपयोग झालाच तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असल्याने, तोहि परिणाम उत्तरोत्तर बंद पडत चाललेला आहे. शिवाय, म्युनिसिपालिटयांकडून जागोजाग विहिरी खोदण्यांत येऊन या प्रचाराला आळा घालण्यांत येतो. - ललितकला:-ललितकलाप्रियता तर आम्हां गोमंतकीयांचे वाळकडच आहे. जात्याच सृष्टिसौंदर्यसंपन्न अशा प्रदेशांत जन्म घेण्याचे भाग्य वांच्यास आल्यामुळे, सौंदर्योपासनेचे वळण सष्टिदेवीनेच गोमंतकीयांना लावले आहे म्हटले तरी चालेल. शहरांतूनच काय, परंतु खेड्यांतूनहि होणाऱ्या भजनादिकांत हार्मोनिअम, तबला, इत्यादि साज नेहमी मिळतो. आणि