पान:गोमंतक परिचय.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ४ थे केवळ एक देवालयांचा प्रश्न मात्र निराळ्या स्वरूपाचा आहे. पुढे योग्य स्थळी देवालय प्रकरणांत याचा विचार होईलच. परंतु जातांजातां दिग्दर्शनादाखल एवढेच सांगितले म्हणजे बस्स आहे की, गोमंतकांतील बहुतेक प्रमुख देवालये एखाद्या कुलाची कुलदेवतेची तरी असतात, मूळच्या ग्रामसंस्थांतर्फे चाललेली ग्रामदेवतेची तरी असतात किंवा प्रांतिक दैवतांची ( प्रांतिक मंडळांनी Camaras gerais चालविलेली) तरी असतात. अर्थात्च कुलदैवतें त्या त्या कुलाच्या मालकीची, ग्रामदैवतें ग्रामसंस्थेच्या ( कोमनदादीच्या) मालकीची व प्रांतिक दैवतें, ज्या ज्या कोमनदादी मिळून तो प्रांत बनलेला आहे,त्या त्या कोमनदादीच्या घटकांच्या मालकीची असतात. पूर्णपणे सार्वजनिक अशी देवालये गोमंतकांत मुळीच नाहीत असे म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच ब्रिटीश हिंदुस्थानांतल्यासारखी हक्काची भांडणें सार्वजनिकतेच्या मुद्यावर येथे चालू शकत नाहीत. प्रत्येक देवालयाचा स्वतंत्र असा कायदा (Compromisso) महाजन मंडळीच्या सरकारी कायद्यास अनुसरूनच झालेला असल्यामुळे, कायद्यानेच देवालयांत महाजनपणाचा हक्क प्रस्थापित करून घ्यावा लागतो, तेव्हां असा वाद चालतो; परंतु त्याला जातिभेदीय स्वरू. पाच्या तंट्याऐवजी व्यक्तिगत हितसंबंधाच्या तंटयाचे स्वरूप यतें. अस्पइयता तर गोमंतकांत आजला देवालयप्रवेशापुरतीच शिल्लक राहिली आहे. सार्वजनिक जागा, सरकारी शाळा, पुष्कळशा खासगी शाळा, बाजार, विहिरी, पाणवठे इत्यादि जागांतून ती मुळीच पाळली जात नसते. इतकेच नाहीं तर ब्राह्मणांच्या विहिरीवर अस्पृश्य पाणी भरीत असलेले दृश्य गोमंतकांत सर्व सामान्य आहे. खेड्यांची रचना महाराष्ट्रांतल्याप्रमाणे गांवठाण निराळे व शेती जमीन निराळी अशी नसल्याने, सामान्यत: खेडेगांवांतून एकमेकांना लागून अशी घरें फारशी नसतात तर बागाइती किंवा इतर जमिनीतून स्वैरपणे विखुरलेलींच दिसतात आणि त्यांतच मधून मधून अस्पृश्यवर्गाचीहि घरे असतात. निराळा असा महारवाडा क्वचितच दिसतो. घरेदार व राहणी:-हिंदु समाजांतील घरे, सुखसोयींच्या दृष्टीने ख्रिस्त्यांइतकी नीटनेटकी व आरामशीर नसली, तरी स्वच्छतेच्या बाबतीत त्यांना दोष देण्याला फारशी जागा नसते. आणि प्रस्तत लेखकाने पुणे, महाराष्ट्रांतील किंवा गुजराथमधील बरीच खेडेगांवें आणि शहरें पाहिली आहेत, त्यांशी तुलना केल्यास, आमची खेडेगांवें व शहरें पुष्कळच स्वच्छ आहेत, असे कोणीहि कबूल करील. त्या