पान:गोमंतक परिचय.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय १२२ O Oriente नांवाचे एक साप्ताहिकही अलीकडेच निर्धू लागले आहे. Pradipa:-हें नियतकालिक प्रकाशाचेंच धाकटें भावंड शोधते. प्रकाश बंद होतांच डॉ. बाळकृष्ण दत्ताराम साखरदांडे यांनी ते ता. ४ डिसेंबर १९२९ रोजी सुरू केले. याचे धोरण देखील प्रकाशासारखेच असल्यामुळे, दुसऱ्याच अंकाच्यावेळी सरकारने त्याला सेन्सॉरचा रस्ता दाखविला. सेन्सॉरची योजना कोणत्या कायद्यान्वये केली गेली आहे, असा प्रश्न संपादकांनी सरकारला केला व त्याचे उत्तर न आल्यामुळे पत्र सेन्सॉरकडे न पाठवितां तसेंच चालू केले. तेव्हां सरकारच्या हुकूमावरून त्याचे अंक टपालांत जप्त करण्यांत आले. त्याचप्रमाणे आदमिनिस्रादोराने प्रदिपाच्या कचेरीत शिरून तेथील अंकही जप्त करून नेले. बेकायदेशीर रीतीने टपालांत अंक अडकविल्याबद्दल त्या खात्याच्या डायरेक्टरवर, आणि बेकायदेशीरपणे घरांत शिरून अंक जप्त केल्याबद्दल, निवासस्वातंत्र्याच्या भंगासाठी आदमिनिस्वादोरावर, फौजदारीत केस चालविली आहे. पत्राचा तिसरा अंक पुनर्मुद्रण करून माणसांकडून गोवेंभर वांटला गेला. त्याचप्रमाणे पुढील अंकही वाटण्यांत येतात; पत्र मुळचे साप्ताहिक होतें तरी या प्रकारामुळेच तें अनियमित बनले आहे. या शिवाय पोर्तुगीज भाषेत वाङ्मयात्मक, शास्त्रीय, कायद्यांविषयी लिहिणारी, बरीच वृत्तपत्रे होऊन गेली. विस्तारभयामुळे त्यांचा गोषवारा देण्याची इच्छा मागें सारावी लागत आहे. तूर्त Oriente Portugues हे पुराणवस्तुशास्त्रविषयक, BoletimGeral de Medicina e Farmacia हे वैद्यकविषयक, Boletim Sanitario हे आरोग्य विषयक, Gazeta da Relacao de Nova-Goa हे कायद्याविषयींचें, Boletim de Agricultura हे शेतकीविषयक, अशी उत्कृष्ट छपाईची नियतकालिके चालू आहेत. मुद्रणस्वातंत्र्याचा कायदा:-मुद्रणस्वातंत्र्याचा हक्क कार्त कोश्तितुसियोनालच्या कलमांमुळे प्रजेस मिळाला आहे. त्याचा जो स्वतंत्र कायदा होता त्यांत वारंवार फरक झाला होता. जनरल कार्मोनाच्या प्रस्तुतच्या लष्करी सरकारनें वसाहतीसाठी मुद्रणस्वातंत्र्याचा स्वतंत्र कायदा करण्यापूर्वी, पत्राचा एडीटर हा पोर्तुगीज नागरिकाचे हक्क असलेला असावा लागे व त्याने एतद्विषयक कायद्यांत ठरविलेल्या दीड हजार रुपयांची जामिनगिरी न्यायकोर्टात मांडावी लागे. पत्रांत आलेल्या निनावी लेखांबद्दल हा एडिटर जबाबदार समजला जाई व सहीनिशी