पान:गोमंतक परिचय.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२१ प्रकरण चवथे. आजवर चालू आहे. हिंदूंच्या रास्त आकांक्षांनां विरोध करण्याचा एकही प्रसंग त्याने दवडला नाही. ख्रिस्तीसमाजांत त्यामुळे याला बराच मान आहे. - O Progresso, म्हापशें, ता. १०-३-१९१७ ते १५-११-१९१९; * Opiniao, प्रारंभी ओडली व मग वास्कोदागाम, ता. १२-११-१९१७ ते २९-३-१९१९; O Portugues, पणजी, ता. ६-८ १९१९ ते २६-९१९१९ Nacional, पणजी, ता. ३-११-१९१९ ते ९-३-१९२० । __Diario de. Noite:-हें दैनिक पणजी येथे ता. १-१२-१९१९ रोजी सुरू झाले व आजवर चालतें. वक्रनीति, कुटिलपणा व भरमसाट लिहिणे, यांत याचा हात धरणे अशक्य आहे. प्रागतिक हिंदूंचा द्वेष करण्यांतच हे आपली इतिकर्तव्यता मानते. हे रात्रीचे निघत असल्यामुळे व त्याच्या धोरणामुळे त्याला “रात्रींचर" असें सार्थ नांव पडले आहे. A Tribuna कळंगूट ता. २-१-१९२० पासून सुरू आहे. - Provincia:-सुप्रसिद्ध पोर्तुगीज पत्रकार सि. पेरैर बाताल्य हे याचे संपादक होते. हे युरोपियन समाजाचे पत्र होते. परंतु निर्भीड व सडेतोड लेख. सरकारी बातम्यांच्या पुरवठ्याबरोबर नूतन वृत्तसार व आकर्षक स्वरूपाची मांडणी यांमुळे हे वाचनीय होते. पाद्रीशाही व धर्मवेड यांवर या पत्राचा तोडगा रामबाण होता. पेरैर बाताल्य हे इकडून जातांच तें बंद पडले. ___India Portuguesa हे दैनिक उपरोक्त लांतेन, रेबाति इत्यादिकांचेच भावंड आहे. इ. स. १९२६ साली उल्लेखित फांच्युलॉयॉल यांनी ते पणजी येथे सुरू केले. हिंदुद्वेषांत तें बरेंच अग्रेसर असून त्यांत लिसेवाच्या प्रोफेसरांचा हात असतो. पूर्वी तें मडगांव येथे साप्ताहिकाच्या स्वरूपांत निघत होतें.. _Pracasha:-हें द्विसाप्ताहिक पणजीच्या हिंदु पुढाऱ्यांनी ता. २२ मार्च १९१८ रोजी शुद्धीकरणास मदत करण्याकरितां सुरू केले. अभियुक्त भाषासरणी व निर्भीड व सडेतोड विचार, यांमुळे हे बरेच लोकप्रिय झालें होतें. विशेषतः ख्रिस्ती पत्रकर्त्यांकडून हिंदुसमाजावर वेळी अवेळी होणारे हल्ले परत. विण्याची व प्रजेच्या रास्त हक्कांची राजदरबारी पाठराखणी करून प्रस्तुतच्या लष्करी डिक्टेटर पद्धतीला विरोध करण्यांत या पत्रानें अग्रेसरत्व मिळविलें होतें. अलीकडे सुप्रसिद्ध लेखक सिं. मिनेझिझ ब्रागांस यांचे लेख याच पत्रांतून प्रसिद्ध होत असत. माजी नामदार दो. व्यंकटेश वि. सूर्यराव सरदेसाई हे याचे संपादक होते. गेल्या नवंबरअखेर स्वतः संपादकांनीच तें सेंन्सॉरच्या त्रासामुळे बंद केले.