पान:गोमंतक परिचय.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२३ प्रकरण चवथे. प्रसिद्ध झालेल्या लेखांबद्दल लेखक व एडीटर हे दोघेही जबाबदार ठरत. जनरल कार्मोनाच्या नव्या कायद्यान्वयें, नियतकालिकांचा डायरेक्टर कोठची तरी उच्च शिक्षणाची पदवी असलेला किंवा वैशेषिक शिक्षण घेतलेला पोर्तुगीज नागरिक असावा लागतो. प्रसिद्ध झालेला लेख डायरेक्टरला न कळतां छापला गेल्यास त्या लेखनाची जबाबदारी, लेख सहीने प्रसिद्ध झाल्यास लेखकावर व निनावी असल्यास पत्राच्या मालकावर पडते. पोर्तुगीज भाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेत नियतकालिक काढावयाचे झाल्यास, या पदवीधराला सरकारची आगाऊ परवानगी मिळवावी लागते. आणि ती देणे न देणे हे सरकारच्याच मर्जीवर अवलंबून असते. पोर्तुगीज इंडिया बाहेरची जी नियतकालिके आंत येतात ती पोर्तुगीजेतर भाषेत असल्यास, अशा पत्रांची आवक पेनाच्या एका फटकाऱ्यासरशी बंद करण्याचा अधिकारही या कायद्याने सरकारला मिळाला आहे. तरीपण नियतकालिकांवर सेन्सॉर बसविण्याचा किंवा जामिनगिरी मागण्याचा अधिकार मात्र त्यांत नाही. नियतकालिकांशिवाय पत्रके, पुस्तकें, वगैरे काढावयाची असल्यास, त्याचा प्रकाशक लिसेवची पांचवी इयत्ता पास झालेला असावा लागतो. प्रस्तुत पुस्तक जर गोमंतकांत प्रसिद्ध झाले असते, तर असा प्रकाशक लेखकाला मिळवावा लागला असता. पत्रांत प्रसिद्ध झालेल्या मजकुरामुळे एकाद्या गृहस्थाची किंवा संस्थेची बदनामी झाल्यास त्या मजकुरास देण्यात येणारे उत्तर त्याच जागी व दुसऱ्याच अंकांत प्रसिद्ध करण्याची जबाबदारी कायद्याने संपादकावर आहे.... मुद्रणस्वातंत्र्याच्या कायद्याचे स्वरूप थोडक्यांत याप्रमाणे आहे.