पान:गोमंतक परिचय.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय १२०. होते; O Commercio ( दैनिक ) पणजी, ता. १-१०-१९०९ ते ३०१२-१९१२. हे रात्रीचें प्रसिद्ध होई; O Debate हे साप्ताहिक पणजी येथे सि. मिनेझिझ ब्रागांस यांनी ता. ३-४-१९११ रोजी काढले. भारदस्त व व्याजोक्तिपूर्ण अशी अभियुक्त भाषा, निर्भीड व सयुक्तिक विचारसरणी आणि केवळ एकाच माणसाचे धोरण, यामुळे गोमंतकीय नियतकालिकांत त्याने कायमचें नांव ठेविले आहे. रिपब्लिकनें गोव्यांत पाठविलेले पहिलेच गव्हर्नर दो. कौसेर दा कॉश्त यांचा उत्कृष्ट पाठपुरावा या पत्राने केला होता. त्यामुळे तत्कालीन राजकारणांत याचे धोरण प्रजेस पुष्कळदां नावडतें झाले होते. परंतु धर्म व राजकारण यांची फारकत व्हावी असे प्रतिपादण्याचे धैर्य आणि क्याथोलिक धर्मवेडाचा निःपक्षपाती टीकाकार बनण्याची धडाडी याच पत्राने दाखविली. अजूनही त्याचे लेख ताजे वाटतात. ता. १६-२-१९२१ रोजी तें बंद पडले. _* O Popular. वाकें, ता. ४-१०-१९११ ते २०-५-१९१२; O Povo, (द्विसाप्ताहिक) मडगांव, ता. २६-७-१९१२ ते १२-२-१९१३; * Jornal da India, ओडली, ता. १४-३-१९१३ ते २६-८-१३; Boletim do Comercio, पणजी, ता. २९-३-१९१३ ते २९३-१९१५; A Patria, पणजी, ता. ६-८-१९१३ ते २०-१०-१९१४ आणि पुनः ६-७-१९१९ ते १९२३ पर्यंत चालले. * Rebate, ओडली, ता. १-१०-१९१३ ते १२-६-१९१४; Vida Nova, म्हापशें, ता. १७-११-१९१३ ते २२-९-१९१७; Jornal do Povo, पणजी, ता. १४-७-१९१४ ते १०-१०-१९१८; *Lanterna, ओडली, ता. १-१०१९१४ ते २-१२-१९१६; O Liberal, साळगांव, ता ५-१०-१९१६ ते १२-३-१९१९. A Terra:-0 Ultramar मधून फुटून निघून सि. लिबॅरियु फेरैर यांनी हे साप्ताहिक मडगांव येथे ता. १-१-१९१७ रोजी सुरू केले असून

  • ही सारी वर्तमानपत्रे जुजें इनासियु फ्रांसीइकु दा लॉयॉल ऊर्फ फांच्यु लॉयॉल या सुप्रसिद्ध चळवळ्या गृहस्थाने चालविली होती. भरमसाट लिहून आपला मतलब साधणे हेच या पत्रांचे धोरण दिसे. तरी पण भाषा आकर्षक असल्यामुळे त्यांनां बरेच वाचक मिळत.