पान:गोमंतक परिचय.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११९ प्रकरण चवथे. O Heraldo:-हें गोमंतकांतील पहिलेच दैनिकं पणजी येथे ता. २२-११९०० रोजी सुरू झाले. प्रारंभी त्याला सिं. मिनेझिज ब्रागांस, दो. आंतोनियु दा नोरोन्य, डॉ. आंतोनियु मारीय दा कून्य, डॉ. कॉश्त आल्व्हरिशू इत्यादि कसलेल्या व विद्वान लेखकांची जोड मिळाली होती. प्रजाहिताचे बरेच काम या पत्राकडून तेव्हां झालें. परंतु पुढे मतभेदामुळे व इतरही अनेक कारणांमुळे त्यांत फाटाफूट होऊन चांगले चांगले निस्पृह लेखक त्याला सोडून गेल्यानंतर, आजला हे दैनिक म्हणजे हांजी हांजी करणारे बनले आहे. मध्यंतरी १९१२त ५ महिने, १९१९ त वर्ष दोन वर्षे बंद पडले होते. अभिजात वर्गात आज त्याला तेवढे वजन नाही. ONacionalista, सां तोम, ता. १०- १- १९०४ ते १२-१२-१९१०; O Bardezano, म्हापशें, ता. ४-२-१९०४ ते २२-१२-१९०६; O Indio, चिंचोणे, ता. ९-२-१९०४ते६-४-१९०८; 0 Oriente, म्हापशें, ता. ९-३१९०५ते १२-१२-१९०५; Diario de Goa, (दैनिक) पणजी, १६-१०१९०५ ते १२-२-१९०६; Echo da India, (प्रारंभी दैनिक होते पण लागलीच साप्ताहिक बनले ) मडगांव, ९-९-१९०५ ते २८-६-१९०७; A Reforma, पणजी, ता. १६-१०-१९०५ ते१-१-१९०६ हे साप्ताहिक अत्यंत निर्भीड होते त्यामुळे गव्हर्नरनीं तें बंद पाडले. लिसेवचे जर्मन भाषेचे प्रोफेसर दों तोमाझ द नोरोन्य हे त्याचे संपादक होते. O Imparcial, पणजी, ता. ५-३-१९०६ ते १८-८-१९०६; O Pygmeu (दैनिक), पणजी, ता. ४-२-१९०८ ते ३१-१२-१९०९; पुनः ता. १-६-१९१० ते १४-१०-१९१० पर्यंत चाललें. तें अत्यंत टारगट होतें. O Heraldo:-O Heraldo मधून फुटून निघालेल्या मंडळीने काढलेलें हें दैनिक पणजी येथे ता. २१-५-१९०८ रोजी सुरू झाले. एक धार्मिक बाबत सोडल्यास इतर बाबींत अत्यंत नेमस्त दैनिक. चांगल्या चांगल्या लेखकांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख यांत मधून मधून येत असतात. ताज्या बातम्यांचा पुरवठा व नियमितपणा यांत ते नेहमी वाखाणले जात. O Ariano, चिंचोणे, ता. १६-७-१९०८ ते २७-१२-१९११ व पुनः १९-८-१९१४ ते २५-१२-१९१५ 0 Futuro, बादें, (बारदेश ) ता. ११-४-१९०९ते १२-१-१९१७. मध्ये थोडा वेळ द्विसाप्ताहिकही झाले