पान:गोमंतक परिचय.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय भरून, गर्द अशा गगनचुंबित वृक्षराजींतून, प्रचंड नागिणीप्रमाणे नागमोडीने सरपटत व सळसळ असा आवाज करीत येणाऱ्या या साऱ्या गिरिकन्यका, सपाट प्रदेशांत येतांच आपले मूळचे रानटी स्वरूप त्यागून, जणूं काय श्वशुरगृहाच्या समीपतेची ओळख पटल्यामुळे गजगामिनी बनून आपली मूळची बाल्यसुलभ गडबड व चांचल्य त्यागून, गंभीर व कुलस्त्रियोचित विनयाने मंडित दिसतात. कधी नारळीनी तर कधीं चीप वगैरे झाडांनी युक्त अशी उभय तीरांवरील ती घनदाट, वृक्षराजीनें सभोवतालच्या सपाट अशा हरितवर्ण शेतांमधून जाणारी गोमंतकांतील नदी म्हणजे सृष्टीदेवीने कृपाळु होऊन आम्हां गोमंतकीयांना नयनरम्य असे रस्तेच बांधून दिल्यासारखे दिसते; आणि दिसते म्हणण्यापेक्षा दिले आहेत हाच शुद्ध प्रयोग सत्यास विशेष धरून होणार आहे. कारण अशी एकहि गोमांतकीय नदी नाहीं की जिच्यांत निदान ५ टनाच्या नावा चालत नाहीत. कांहीं नद्यांतून असा मार्ग ४।५ किलोमीटरचा (२।३ मैलांचाच) मिळतो तर दुसऱ्या कित्येकींतून तो तीस पासून ८० किलोमीटरचा मिळतो. विशेषतः मांडवी व अघशी या दोन नद्यांनी स्त्रीस्वभाव सुलभ असा सापत्न भाव सोडून मारलेल्या मिठीमुळे, आम्हांला साऱ्या मध्य गोमंतकभर हा दिव्यपथ उपयोगी पडत आहे. नील नदी, गंगा नदी इत्यादि इतिहासप्रसिद्ध नद्या आपल्या सृष्टीसौंदर्याबद्दल प्रख्यातच आहेत. परंतु गोमंतकांत, चांदण्या रात्रींचे, वल्ह्यांचे तालबद्ध आवाज ऐकत ऐकत होड्यांतून आमच्या नद्यांच्या प्रवाहांनी वनलेल्या चक्रव्यूहांतून ज्यांनी प्रवास केला असेल त्यांना नील, गंगा, किंवा झेलमच्या सौंदर्यात प्रवाहाच्या प्रशस्तपणाशिवाय आणखी कोणतेंच नाविन्य आढळणार नाही, असें उभय ठिकाणची ओळख असलेल्या प्रवाशांनी लिहून ठेवले आहे. अगदी उत्तरेस सरहद्दीवरची तेरेखोलची खाडी १२ मैल लांबीची गोमंतक प्रांतांत वाहते, तिचा उमग मणेरी प्रांतांत झाला आहे. ह्या नदीकांठीं तेरेखोलचे बंदर असून मुखाजवळच उत्तर तीरावर तेरेखोलच्या जुन्या किल्ल्याचे अवशेष आहेत. इतिहासप्रसिद्ध बक्षीवहाद्दर जिवबादादा केरकर यांचा केरी गांव याच नदीच्या दक्षिण तीरावर आहे. कायसुवची खाडी हीदेखील सावंतवाडी प्रांतांत उगम पावून बार्देश व सांखळी कोंसेल्य, पेडणें कोंसेल्यापासून अलग करीत, सुमारे तेरा चौदा मैल पोर्तुगीज प्रांतांतून वाहून कायसुवच्या बंदरांत समुद्रास मिळते. नदीकाठी कायसुव बंदराशिवाय कोलवाळ हैं दक्षिण कांठी व समशेर जंगबहाद्दर लखबादादा लाडांची जन्मभूमी चिखली गांव हा याच नदीच्या तीरावर आहे. कोलवाळ व लखवादादांचे वास्तव्य स्थान