पान:गोमंतक परिचय.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय होत असते. उपरोक्त बार्दु फ्रांसीइकु दा कॉश्त यांनी १८६७ पर्यंत त्याचे संपादकीय स्थान भूषविले. तेव्हांपासून १९२१ पर्यंतच्या दीर्घ कालावधीत ख्रि. वा. आंतोनियु आनाश्ताझियु ब्रुत दा कॉश्त हे त्याचे संपादक होते. पुढे त्यांचे पुत्र ब्राझ आंतोन ब्रूत दा कॉश्त यांनी ते आपल्या हाती घेऊन कालच्या फेब्रुवारी पर्यंत चालविलें. फेब्रुवारीत ब्राझ दा कॉश्त हे निधन पावल्यावर आतां सि. आल्व्हरु व्हियगशू हे त्याचे संपादक आहेत.* यांतील लेख पूर्वी निर्भीड व धर्मवेडापासून अलिप्त असे होते म्हणून त्यावर आर्चबिषपनी बहिष्कार देखील घातला होता. आजही त्याचे लेख निर्भीड व सडेतोड विचारसरणीचे असतात. सासष्ट प्रांतांतील ख्रिस्ती ब्राह्मणसमाजाचें तें मुखपत्र समजले जाई व एकाकाळी तें अत्यंत वजनदार समजले जात होते. अजून गोव्यांतील एकंदर वृत्तपत्रांत याची सांपत्तिक स्थिति चांगली आहे. स्वतःचा भरपूर फंड असल्यामुळे तें वर्गणीवर फारसे अवलंबून नाही म्हटले तरी चालेल. _A India Portuguesa:-सि. मिरांद फ्रांकु नांवाच्या गृहस्थानी हें साप्ताहिक ता. ४-१-१८६१ रोजी सुरू केले. इ. स. १८६६ ते १९०२ पर्यंत तें डॉ. जुजे इनासियु दा लॉयॉल यांच्या हातीं राहिले. त्यांनी तें ओडली येथे आपल्या गांवीं नेले. लॉयाल यांच्या निधनानंतर १९०२ ते १९११ पर्यंत त्यांचे बंधु, आव्हान दा लॉयॉल यांनी तें चालविले. त्यांच्यामागून डॉ. मिगेल दा

  • ख्रिस्तवासी ब्राझ दा कॉश्त यांच्या संपादकीयत्वाखाली दो० रोत ब्रूत दा कॉश्त हे Ultramar पत्रांतून सहसंपादक या नात्याने लिहीत होते. रोबेर्त दा कॉश्त यांनी गोव्याच्या अलीकडच्या ८-१० वर्षांच्या घडामोडींत बरीच कामगिरी केली होती. विशेषतः |तश रिवैर या गव्हर्नरच्या अमदानीत कौन्सिलबहिष्काराच्या झालेल्या चळवळीत त्यांनी प्रामुख्याने भाग घेतला होता. सि. मिनेझिझ ब्रागांस यांच्याबरोबर पोर्तुगीज वसाहतपरिषदेचे ते गोव्यातर्फे प्रतिनिधि निवडले गेले होते. त्यांनी Hidra de Nativismo नांवाचें पुस्तक लिहून आपल्या पित्याने लिहिलेल्या Goa soba Dominacao Portuguesa या ग्रंथाचे कामच त्यांनी पुढे चालविलें. कौन्सिलांत त्यांनी बरेंच महत्वाचे स्थान मिळविले होते. बंधूंमागे एका आठवड्यांतच त्यांनाही काळाने ओढून नेले. इतक्या लवकर त्यांचे निधन होईल ही कल्पना देखील करता येत नव्हती.