पान:गोमंतक परिचय.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण चवथे. Egreja Lusitana do Oriente, Gabinete Literario das Fontainhas, O Mosaico, O Defensor da Ordem e da Verdade, O Defensor do Real Padroado a A Revista Illustrativa परंतु या साऱ्या पत्रांत नांव घेण्यासारखे म्हटले म्हणजे Gabinete Literario das Fontainhas हे मासिकच होते. मागें उल्लेखलेले फिलिप नरि शाव्हियर या विद्वानानें तें १५-१-१८४६ रोजी सुरू करून १८४८ च्या डिसेंबरपर्यंत चालविले. त्यांत तत्कालीन व जुन्या इतिहासांतील बरीच उपयुक्त माहिती आली आहे. या नियतकालिकांशिवाय Boletim do Governo do Estado da India हे सरकारी ग्याझेटही याच छापखान्यांत मुद्रित होई. ता. ७-१२-१८३७ रोजी त्याचा पहिला अंक निघाला. इ. स. १८४३ पर्यंत तें साप्ताहिकच होते. १८४३ जानेवारी ते मेपर्यंत द्विसाप्ताहिक झाले होते; पुनः १८५५ पर्यंत साप्ताहिक झाले; जानेवारी १८५६ पासून १८७९ च्या आगस्ट पर्यंत पुनः द्विसाप्ताहिक झालें; सप्टेंबर १८७९ ते १८८२ एप्रिलपर्यंत पुनः साप्ताहिक; १८८२ मे पासून १८८७ नवंबरपर्यंत दैनिक, १८८७ डिसेंबर ते १८९७ पर्यंत त्रिसाप्ताहिक व तेव्हांपासून आतां द्विसाप्ताहिक असे त्याने अनेक फेरबदल केले. इ. स. १८७९ साली त्याचे नांव बदलून Boletim Oficia असें नवें नांव घेण्यांत आले. प्रारंभीच्या काळी त्यांत अग्रलेख, बातम्या वगैरे येत होत्या आणि संपादकही स्वतंत्र होते. पण पुढे कायद्यानेच त्याची संपादकीय जबाबदारी जनरल सेक्रेटरीवर टाकण्यांत येऊन ते केवळ सरकारी बातम्या देणारे ग्याझेट बनले. खासगी छापखान्याची स्थापना:-वर दिलेली एकंदर नियतकालिके जवळ जवळ निमसरकारीच होती, म्हटले तरी चालेल. कारण, खासगी छापखापाच्या अभावी ती सारी सरकारी छापखान्यांतच मुद्रित होत असत. इ. स. १८५९ साली ख्रिस्तवासी बर्नार्दै फ्रांसीइकु दा कॉश्त यांनी मडगांव येथे छापखाना आणून पूर्णपणे स्वतंत्र असें स्वतःचें 0 Ultramar हे वृत्तपत्र सुरू केले. तेंच पहिले लोकपक्षीय नियतकालिक होतें. O Ultramar:-ता. ६-४-१८५९ रोजी पहिला अंक निघाला, ता. २-१११९०५ पर्यंत साप्ताहिक व तेव्हांच्याने आजवर द्विसाप्ताहिक स्वरूपात प्रसिद्ध