पान:गोमंतक परिचय.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय विद्वान होते असेच म्हणावे लागेल. पराकाष्टेच्या भावनाप्रधान हृदयामुळे त्यांचा स्वभाव अत्यंत गोड झाला होता. वैद्यकीची परिक्षा ते बऱ्याच उच्च वर्गांत पास झाले असतांही हृदयाच्या जन्मजात मार्दवामुळे त्यांना तो धंदा अशक्य झाल्यावरून सोडून द्यावा लागला. फ्रेंच भाषा त्यांना करतलामलकवत् होती व मराठी वाचन करण्याचा त्यांना बराच नाद होता. पणजीच्या लिसेव सेंत्रालांत त्यांना फ्रेंच भाषेचे प्रोफेसर नेमण्यात आले होते परंतु या जागेचा उपभोग घेण्यास ते फारसे जगले नाहीत. SO पोर्तुगीज वृत्तपत्रे. का मुद्रणकलेचा प्रवेशः-गोमंतकांत मुद्रणकलेचा प्रवेश बराच अगोदर झाला होता. इ. स. १५५६ साली जेसुइटांच्या सां पाब्लच्या कॉलेजांत Conclusiones Philosophicas नांवाच्या ग्रंथाचे मुद्रण झाल्याचे आज सप्रमाण सिद्ध झाले आहे. छपाईचे काम सुरुवातीस Juan Bustamante या स्पॅनिश इसमाकडून व L. Fernandes या पोर्तुगीज माणसाकडून होई. इ. स. १६५४ त या छापखान्यांतून फादर स्टीफन्सचें ख्रिस्तपुराण मुद्रित झाले. वृत्तपत्रांची सुरुवातः-मुद्रणयंत्राचा प्रवेश जरी सतराव्या शतकांत झाला होता, तरी इ. स. १८५१ पर्यंत विचारस्वातंत्र्याला मुळीच वाव नसल्यामुळे तोंवर वृत्तपत्रांचा उदय मुळीच झाला नव्हता. इंकिझिसांव, सीलाबुश (धर्माध्यक्षांनी त्याज्य ठरविलेल्या ग्रंथांची यादी), रेयाल मेझ सेंसोर्य, इत्यादि अडचणींमुळे स्वतंत्र विचारांना मुळीच वाव नव्हता. इ. स. १९२१ साली सरकारने गोव्यांत छापखाना आणला व त्यांतून Gazeta de Goa नांवाचें स्वतःचें वर्तमानपत्र काढण्यास सुरुवात केली. डॉ लीम लैतांव हेच त्याचे संपादक होते. तत्कालीन राजकीय घडामोडींचा या वृत्तपत्रांतून ऊहापोह होत असला, तरी हे सरकारी कामकाजालाच विशेषेकरून वाहिलेलें होतें. या छापखान्यांतून आणखीही पुष्कळ वर्तमानपत्रे निघाली होती परंतु चार वर्षांवर त्यांतले एकही जगले नाही. खाली त्याची यादी कालानुक्रमाने जात आहे. Chronica Constitucional de Goa, Echo da Lusitania, Vigilante, O observador,O Encyclopedico, O Compilador, O Correio de Nova-Goa, Appenso ao Boletim Official, A Voz dos Povos da India, Jornal da Santa