पान:गोमंतक परिचय.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११३ प्रकरण चवथे. कामगिरी बरीच आहे असे त्यांच्या ग्रंथांवरून दिसून येते. इझिदोर येमीलियु बातीश्त हे पारीसच्या युनिव्हर्सिटीचे डॉक्टर ऑफ फिलॉसफी व मेडीकल डॉक्टर होते. आणि त्याच युनिव्हर्सिटीत त्यांना प्रोफेसरीची जागा मिळाली होती. विख्यात शास्त्रज्ञ Wurtz यांनी लावलेल्या शोधांतील महत्वाचा भाग त्याच्या ज्या पोर्तुगीज शिष्याने तयार केल्याचे इतिहास सांगतो तो शिष्य म्हणजे आगुश्तीन्य व्हिसेतीन्यु लोरेंसु या नांवाचा गोमंतकीयच होय. रसायन शास्त्रांतील त्याची पारंगतता जगप्रसिद्ध होती. लोटलीचे झै कोश्तांसियु द फारीय हे कोईव्र युनिव्हर्सिटींत देवविद्येचे प्रोफेसर होते. रायमुंदु व्हेनांसियु रुद्रीनिश व मार्किजू लोब हे दोन गोमंतकीय त्याच युनिव्हार्सटींत अनुक्रमें तत्त्वज्ञान व गणीत या शाखांचे प्रोफेसर होते. अगदी अलीकडच्या काळांत देखील डॉ. आल्फ्रेद दा कॉश्त हे लिज्बोअ युनिव्हर्सिटीत व डॉ. रोबेतु फ्रीयश हे पोर्तुगीज युनिव्हर्सिटींत प्रोफेसर होते. ख्रिस्ती धर्मपीठांच्या विषपसारख्या उच्च हुद्यावर पोंचून पोर्तुगालांत मानमान्यता मिळविणारे ख्रिस्ती बरेच होऊन गेले. त्यापैकी दो मातेउझ द काश्त्रु व दो तोमाझ द काश्त्रु हे दोन लोटलीचे गृहस्थ, दों कुश्तोदियु दु पीन्यु हे वेणेचे व दो व्हिसेति दु रुझारीयु हे रायचे अशा चौघांचीच नांवें आम्हांला मिळाली. नासिमेत मैदोस हे बारदेशकर व डॉ. पालीन दीयश् हे तिसवाडीकर, पोर्तुगीज कवींत बऱ्याच उच्च दर्जाचें स्थान मिळविलेले कवि होते. केरीच्या दादासाहेब वैद्यांनी सुरू केलेल्या Luzde Oriente मासिकांतून या उभय कवींच्या कविता, अनुक्रमें “ नीतिपाल मुनि " व "प्रीतिदास" या टोपण नांवांखाली प्रसिद्ध होत असत. डॉ. पाब्लीन दीयशू यांनी भगवद्गीतेचे पोर्तुगीज भाषांतरही प्रसिद्ध केले असून “ विष्णुलाल" व ( Paiz do Sol ) “सूर्यावर्त" ही दोन खंडकाव्ये रचून प्रसिद्ध केली आहेत. " विष्णुलाल" हे काव्य संशयवादी व दुःखपर्यवसायी असून फारच उत्कृष्ट आहे. पणजीच्या नॉर्मल स्कुलांत ते सायन्सचे प्रोफेसर होते. त्यावेळी प्रस्तुत लेखकाला त्यांच्या शिष्यत्वाचा लाभ झाला होता. नेमलेली ठराविक पुस्तकें शिकवून झाल्यावर विषयाची बरीच अवांतर माहिती शिष्यवर्गाला देण्यांत त्यांचा हातखंडा असल्यामुळे त्यांचा तास केव्हां संपे याची त्यांना व आम्हां शिष्याना जाणीव देखील होत नव्हती. गोव्यांतील नामांकित संगीतज्ञांतही त्यांची गणना होत होती. त्याचप्रमाणे चित्रकलेचे स्वतंत्र शिक्षण मिळाले नसतांना देखील तींतही त्यांचा हात बराच कुशल होता. थोडक्यात सांगायचे झाल्यास ते एक अष्टपैलू