पान:गोमंतक परिचय.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ११२ स्थान शोभविले होते. या गृहस्थांनी लिहिलेले बरेच ग्रंथ आहेत. त्यांपैकी (Goa sob a Dominagao Portuguesa ) "पोर्तुगीज सत्तेखाली गोव्याची स्थिति" नांवाचा ग्रंथ इतिहासांत प्रमाणभूत मानला जातो. हे पुस्तक लिहितांना प्रस्तुत लेखकाला त्या ग्रंथाचा पावलो पावली उपयोग झाला आहे. कॉश्तांच्या घराण्यांत तूर्तदेखील बरेच पुरुष या मालिकेत येण्याच्या लायकीचे आहेत, परंतु त्यांचा हयातीतच उल्लेख करणे ठीक न दिसल्यावरून तो इकडे केला नाही. फिलिफ नरी शाव्हियर हे गृहस्थ १९ व्या शतकाच्या मध्यभागापर्यंत गोमं. तकांत नावाजलेले लेखक म्हणून गाजले होते. सेक्रेटरिएट मध्ये ह्यांच्याकडे अंतर्गत कारभाराचें अत्यंत महत्वाचे खातें संपविण्यांत आले होते. तेथे त्यांनी सेक्रेतारीय जराल ( सेक्रेटरीएट) मधील दुय्यम सेक्रेटरीच्या जागेपर्यंत मजल गांठली होती. सरकारी कामें संभाळून गाबिनेति लितेरायु द फीताईन्यशू या नांवाचे एक लहानसें नियतकालिक ते प्रसिद्ध करीत, त्यांतून त्यावेळची व तत्पूर्वकालीन दुर्मिळ माहिती संकलित केली होती. त्याचप्रमाणे ( Bosquejo Historico das Comunidades de Gia) “ गोमंतकीय कोमुनदादींची ऐतिहासिक रूपरेषा” या नांवाचेही एक पुस्तक प्रसिद्ध केलें. ही उभय पुस्तकें इतिहासांत प्रमाणभूत मानली जातात. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखनांत या उभय पुस्तकांचीही पुष्कळच मदत झालेली आहे. इज्मायल ग्रासयिश् हे अलीकडच्या विद्वानांतील होत. यांनी वेळोवेळ संशोधनात्मक असे अनेक ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. लिसेव नासियोनालमध्ये हे अर्थशास्त्राचे अध्यापक असतांना त्याच्या अध्यापनकौशल्याचा लाभ प्रस्तुत लेखकाला मिळाला होता. अर्थशास्त्रासारखा विषय अत्यंत सुगमपणे दृष्टांत उदाहरणांनी पटवून द्यायची त्यांची हातोटी इतकी विलक्षण होती की, त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर पुस्तक देखील उघडण्याची विद्यार्थ्यांना गरज पडत नसे. हे देखील सेक्रेटरिएट मध्ये एक नावाजलेले ऑफीसर होऊन गेले. दुय्यम सेक्रेटरीची जागा त्यांनी बरीच वर्षे उपभोगिली होती. यांच्या निधनानंतर कांहीं काल सेक्रेटरीएटमध्ये त्यांची उणीव तीव्रपणे भासण्याइतकी त्यांची कामगिरी अष्टपैलू होती. पाद्रि रोदोल्फु दालगाद हे बारदेशकर खिस्ती पोर्तुगालच्या युनिव्हार्सटींत संस्कृत भाषेचे प्रोफेसर होते. त्यांनी पोतुगीज-कोंकणी व कोंकणी-पोर्तुगीज असे दोन कोश तयार करून प्रसिद्धही केले आहेत. ऐतिहासिक संशोधनांतही त्यांची