पान:गोमंतक परिचय.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१११ प्रकरण चवथे. आला ते फ्रांशीश्कु लुईश गोमिश हे दुसरे व पहिल्याच हिंदी गव्हर्नरच्या हाताखाली जनरल सेक्रेटरी या नात्याने आलेले, कोश्तांस्यु रोकिदा कॉश्त ( विद्यमान असलेले नव्हेत तर त्यांचे पूर्वज ) हे तिघेहीजण पोर्तुगीज पार्लमेंटचे विख्यात सभासद होऊन गेले. सिन्योर गोमिश हे जशी पोर्तुगीज तशीच फ्रेंच भाषाही अस्खलितपणे लिहीत व बोलत असत व त्यांच्या लेखनपटुत्वामुळे पोर्तुगीज वाङ्मयांत देखील त्यांनी बरीच महत्वाची जागा मिळविली होती. मडगांवचे कॉश्तांचें घराणे तर सुप्रसिद्धच आहे. त्या घराण्यांतून पिढीजाद विद्वान कर्तृत्वशाली पुरुष गोव्याला मिळाले आहेत. बर्नार्दु फ्रांसीरकुदा कॉश्त यांनी गोमंतकांतील पहिले प्रजापक्षीय वृत्तपत्र Ultramar हे इ. स. १८५९ साली स्थापन केले. आपल्या पाउणशे वर्षांच्या हयातीत हे गृहस्थ पांचदां पार्लमेंटांत निवडून गेले होते. यांचा कार्याचा व्याप बराच मोठा होता. भाषा, वाङ्मय, शिक्षण, राजकीय उलाढाली, सांपत्तिक चळवळी, इत्यादि सर्व अंगांत तत्कालीन परिस्थितीत त्यांनी महत्वाची कमगिरी केली आहे. त्यांच्या हयातीत चालू असलेल्या एकंदर महत्वाच्या उलाढालींत त्यांचा हात प्रामुख्याने असे. मागे सांगितल्याप्रमाणे १८९५ सालच्या दादा राण्यांच्या बंडांत यांच्यावर सरकारची इतराजी होऊन दीव येथे त्यांना हद्दपार व्हावे लागले व तेथेच त्यांचा अंत झाला. पोर्तुगीज प्राथमिक शाळांचे ते इन्स्पेक्टर होते. त्यांनी त्या वेळी तयार केलेली क्रमिक पुस्तकें अजूनही शिळी वाटत नाहींत. उल्नामार पत्रांतून प्रसिद्ध होणारे त्यांचे लेख, गोमंतकाभिमानाने ओथंबलेले व धार्मिक पक्षाभिनिवेशापासून बरेचसे अलिप्त असे असत; म्हणून आर्चबिषपनें त्या पत्रावर बहिष्कार देखील पुकारला होता. जुजे इग्नासियु द लायॉल हे चाड्डो या वर्गातील गृहस्थ, ब्राह्मण व चाड्डो यांच्यामधून गोमंतकाच्या पुढारीपणासाठी त्या वेळी चाललेल्या चकमकीत, बरेच पुढे आले होते. उल्नामारच्या मागोमाग १८६१ सालीं, मानवेल लोरेंसु द मिरांद फ्रांकु नांवाच्या गृहस्थाने स्थापन केलेले “अ इंदिय पोर्तुगेज" नांवाचें वर्तमानपत्र याच गृहस्थांच्या ताब्यांत गेलें होतें. त्यांतून ते आपल्या पक्षाचे समर्थन करीत असत. लॉयॉलाचा पक्ष त्या वेळी हिंदुसमाजांत देखील बराच लोकप्रिय झाला होता. परंतु कां तें आज सांगतां येत नाही, इतकी त्या लोकप्रियतेची कारणे क्षुल्लक होती. त्यांचे समकालीन उल्लामाराचे संपादक आंतोनियु अनाश्ताझिय ब्रूत दा कॉश्त, उपरोक्त कोश्तांसियु रॉकि दा कॉश्त ह्यांचे पुत्र, हे कॉश्त घराण्यांतील तिसरे धडाडीचे पुरुष होते. सन १८६७ पासून १९११ पर्यंत सुमारे ५२ वर्षे यांनी उल्त्रामारचे संपादकीय