पान:गोमंतक परिचय.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ११० येतात. त्यांची सौंदर्योपासक प्रवृत्ति इतकी उच्च आहे की, मुंबईच्या व्हाइट वेलेडलॉ, इव्हन्स फ्रेझरसारख्या युरोपियन फर्ममध्ये, कपड्यांची प्याटर्न निवडायला गोमंतकीय खिस्तीच नेमले जातात. आहारांत, उकडा तांदूळ व तोही गोमंतकांत पिकणाऱ्या भाताचा, बीफ, डुकराचे मांस, कोंबड्या यांची रेलचेल असते. गोमंतकांतील फळांचा खपही याच समाजांत जास्त असतो. उलटपक्षी दारूचा प्रसार देखील याच समाजांत विशेष आहे. दारूच्यापायीं सर्वस्व गमावलेली किंवा संततीचे शारीरिक नुकसान करून वेडी, अपंग अशी संतति निर्माण करणारीही कुटुंबें बरीच असतात. या लोकांच्या घरांच्या बांधणींत एक विशेष असतो; मध्ये राजांगण व सभोवती चौक असलेली घरें, या समाजांत मुळीच नसतात. स्वयंपाकघर बहुतकरून युरोपियन पद्धतीप्रमाणे स्वतंत्रच असते. मात्र तें अत्यंत गलिच्छ असतें. शौचकूप व स्वयंपाकघर एकमेकांना लागून असलेल्या दोन खोल्यांतून असतात. हे दृश्य परक्या इसमाला होतां होईतों न दिसण्याची दक्षता मात्र बाळगण्यांत येते. घरें बांधतांना, त्यांच्या सुरक्षिततेपेक्षां सुखसोयीकडेच विशेष लक्ष पुरविण्यांत येत असते. जेवणघर व दिवाणखाना ही दोन दालने घराच्या सर्व भागांत विशेष प्रेक्षणीय दिसतात. संपन्न कुटुंबांतील दिवाणखाना इतक्या उच्च अभिरुचीने शृंगारलेला असतो कीं तें एक छोटेसें संग्रहालयच असते म्हटले तरी चालेल; इतकें सारें असूनही सामान्यतः कपड्यांच्या आंतून, ख्रिस्ती बहुजनसमाज बराच घामट असतो. व्यसनी व फटींग अशी थोडी मंडळी सोडून दिली तर व्यवहार व देवघेव या बाबतींत या समाजाची टापटीप वाखणण्याजोगी असते. आणि त्याचमुळे एकंदरीत त्यांचा संसार व्यवस्थेशीर व फायदेशीरच बनतो, प्रसिद्ध पुरुषः-ख्रिस्ती समाजांत आजवर बरेच प्रसिद्ध पुरुष होऊन गेले. 'परंतु चिरस्थायी महत्वाची व लोककल्याणकारक अशी कायें ज्यांच्या हातून झाली, असे त्यांतून फारच थोडे आहेत. या रीतीने पाहिल्यास, कायतानु व्हितोरीयुद फारीय, व त्यांचे पुत्र जुजे कुश्तोदियु फारीय यांनी १७८७ च्या सुमारास युरोपांतील मोठमोठ्या शहरांतून रसायनशास्त्रज्ञ व जादूगार म्हणून ख्याति मिळविली होती; ब्रिटिश साम्राज्यांत लॉर्डशिप मिळविणारा पहिलाच हिंदी इसम सुवारिश नांवाचा गोमंतकीय होता. १८२० च्या पोर्तुगीज राज्यक्रांतीच्या वेळी, इकडून पार्लमेंटांत निवडून गेलेले, बर्नार्दु परिशद सीव्ह, ज्यांना त्यानंतर १८३५ त पार्लमेंटातर्फे नेमण्यांत आलेल्या पोर्तुगीज इंडियाच्या गव्हर्नरचा मान मिळाला. ते एक, ज्यांचा शतसांवत्सरिक उत्सव मुंबईत व गोव्यांत नुकताच साजरा करण्यांत