पान:गोमंतक परिचय.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०९ प्रकरण चवथे. पांव द सांतु आंतोनियुः–ही संस्था वस्तूंच्या रूपाने बक्षिसे देणारी लॉटरी काढीत असून दरसाल हिचे उत्पन्न सुमारे तीन हजारांचें असतें. १९२७ साली उत्पन्न ३४९६ रुपये होऊन ३१६२ रुपये खर्च झाला. संस्थेतून गरीब दुबळ्यांना भिक्षा वांटण्यांत येते. - आसिश्तेसिय इ. ( पणजी): ही एकच संस्था मात्र लॉटरीशिवाय केवळ लोकाश्रयाने चाललेली आहे. हिनें अनाथ अपंगांसाठी पणजीत एक इमारत घेतली असून तिच्यांत अनाथांना रहावयास जागा व उपजीविकेसाठी दर आठवड्यास शिधा वांटण्यांत येतो. हिचे सभासद जसे खिस्ती तसेच युरोपियन व हिंदूही आहेत. १९२७ सालीं हिचे उत्पन्न ७,९६४ रुपये होतें व खर्च ५,५९६ रु. होते. या कार ' हा सारा तपशील वाचला असतां, सार्वजनिक कार्यास स्वार्थत्यागपूर्वक मदत करावयाची प्रवृत्ति खिस्ती लोकांत किती कमी आहे हे सहजच दिसून येईल. वाङ्मयात्मक संस्था तर या वर्गात मुळीच नाहीत म्हटले तरी चालेल, इतकी त्यांची संख्या कमी आहे, व असलेल्याही केवळ जीव धरून आहेत म्हणण्याजोग्या स्थितीत दिसतात. तरीपण मोठमोठ्या लोकांना मेजवानीसहित मानपत्रे देणे व वेळी प्रसंगी नाच मेजवान्यांसाठी फंड काढणे, इत्यादि कार्यांत त्यांच्याकडून पुष्कळ खर्च होत असतो. - घरेदार व राहणी:-ख्रिस्ती समाजांतील अभिजात वर्गाची घरेदारे सामान्यतः टुमदार व स्वच्छ असतात. योग्य तें फर्नीचर घरांतून ठाकठीकपणे मांडलेले आढळतें. समायिक कुटुंबपद्धतीला केव्हांच फांटा मिळाला असल्याने, व अविवाहित मुलांमुलींमुळे, कुटुंबाचा आवरही कमी दगदगीचा बनत असतो. मध्यम स्थितींतील प्रत्येक कुटुंबांत एकाददुसरा नोकर व स्वयंपाकी असल्यामुळे. स्त्रीवर्गाला तेवढे कमी श्रम पडून इतर कामांकडे लक्ष द्यायला फुरसत मिळते. बहुतेक कुटुंबांत घरची व्यवस्था व बाजारहाट देखील स्त्रियाच करतात. जमिनीची मशागत, नारळाचा पाडा, भात वसूली, यांवर अभिजातवर्गीय स्त्रिया देखरेख करतात व कनिष्ठ वर्गातील स्त्रिया जातीने खपतात. संगीत कलेत तर हा समाज बराच पुढारलेला आहे. मध्यम कुटुंबांत देखील एखादा पिआनो असतोच व बहुतेक स्त्रीपुरुषांना पाश्चात्य संगीताचे सशास्त्र ज्ञान मिळालेलें असतें. ब्रिटिश हिंदुस्थानांतच नव्हे, तर जगावरील पुष्कळ ठिकाणी, गोमंतकीय ख्रिस्ती संगीतज्ञ आपल्या कलेच्या जोरावर पैसा व मानमान्यता मिळवीत असलेले दिसून