पान:गोमंतक परिचय.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय १०८ लॉटरी काढण्याची परवानगी मिळून १८७९ सालापासून लॉटरीचे उत्पन्न मिळू लागले. पहिल्याच लॉटरीचे उत्पन्न केवळ ५१२ असा मिळाले होते. आज संस्थेची कचेरी मडगांव येथे असून तिच्या तर्फे एक हॉस्पिटल साऱ्या आधुनिक सामुग्रीनें मंडित असें चालत आहे. व त्यांत दरसाल सुमारे १००० रोग्यांना उपचार होतात हे मागें सांगितलेच आहे. या हॉस्पिटलांत किंवा मिझेरकोर्दीच्या हॉस्पिटलांत हिंदूंना मज्जाव नाही. परंतु त्यांच्यासाठी निराळी सोय फारशी नाही, त्यामुळे व कांहींसें धार्मिक स्वरूपामुळे, हिंदूलोक या उभय संस्थांचा फायदा घेत नसतात. -- ओइपीस्युचे नक्की उत्पन्न १९२७ साली २,४६,७४७ रु. होते. त्यांत फंडाच्या व्याजाचे उत्पन्न ७३,६०० रुपये होते व केवळ लॉटरीचेच उत्पन्न १,६६,९८२ रुपये होते. हॉस्पिटल प्रीत्यर्थ दरसाल ६०,२४८ रुपये खर्च होतात. निरनिराळ्या मदतीदाखल २३००० रुपये खर्च होत असतात. आणि चालू खर्च काढल्यास सुमारे दीड लाख रुपये दरसाल शिल्लक राहते ! शिल्लकेशिवाय संस्थेचे भांडवल १३,१४,२५१ रुपयांचे असून त्यांतील रोकड शिल्लक ९,९१,९२० रुपये आहे. ओइपीसतर्फे चाललेल्या दीनजनांच्या आश्रमाचे वार्षिक उत्पन्न २२,७८७ रुपये असून खर्च सालिना ८,८२० रुपये आहे व स्थायिक फंडासहित मालमत्ता १,०३,११५ रुपयांची असून यांत व्याजी लावलेला फंड ९० हजार रुपये आहे. ह्या दोनही जोड संस्थांचा कारभार सासष्ट प्रांतांतील ख्रिस्ती ब्राह्मणांच्याच हाती आहे. म्हापशेचा आझील: ही संस्था न्यायमूर्ति मौर यांनी १८६३ साला दिसेल्या १०४ पौंडाच्या भांडवलावर स्थापन झाली. पाद्रि दालगाद या बारश कर पाद्याने २३०० पौंड देऊन संस्थेला मदत केली. १९२४ साली वषाक्न १५ सोडत खोलण्याची परवानगी मिळाली आहे. १९२३ सालीं बारदेशकरांनी फंड सुरू करून हॉस्पिटल उभारले आहे. परंतु अजन तें चालू झाले नाही. यात देखील शकराच्या स्वभावाची छटा दिसून येते. तूर्त जरी संस्था लॉटरी काढीत तरा हास्पीटलचा फंड ख्रिस्त्यांनीच उभारला आहे. १९२७ साली संस्थेचें उत्पन्न १५४२ रुपये होते व १९२८ सालच्या लॉटरीत त्याना ७४,२२० रुपये फायदा झाला. या संस्थेतर्फे चालणाऱ्या अनाथालयांत १९२७ सालीं ७३ अनाथ व १६ महारोगी होते.