पान:गोमंतक परिचय.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०७ प्रकरण चवथे. कायती जिवंत आहे. सुरुवातीला या संस्थेतून केवळ अनाथ विधवांना व बालकांना घरोघर मदत पोचविण्यांत येई. पण पुढे या संस्थेतर्फे जुन्या गोव्यांत हॉस्पिटल उघडण्यांत आले व इ. स. १६०६ साली एका आर्चबिषपनें विधवाश्रम व अनाथबालिकाश्रम स्थापन करून ते या संस्थेच्या हवाली केले. नंतर हे दोनही आश्रम अनुक्रमें चिंबल व रायबंदर येथे नेण्यांत आले व अलीकडेच ते पणजी शहरांत “आताईदाचा वाडा" या नावाने ओळखण्यांत येत असलेल्या डोंगरावरील, भव्य व सुंदर वाड्यांत चालत आहेत. जुन्या गोव्यांतील हॉस्पिटल देखील आतां रायबंदर येथील मुद्दाम बांधलेल्या भव्य इमारतींत चालत आहे. देवळांची जप्त केलेली उत्पन्ने ज्या इसमांस दिली गेली होती, त्यांपैकी पुष्कळांकडून ती ह्या संस्थेस मिळत गेली. या इस्टेटीचे उत्पन्न त्या काळी १० हजार असर्फी होते. आणि पुढें लॉटरी उघडण्याची सवलतही सरकारांतून मिळाली. त्यामुळे ही संस्था आज बरीच भरभराटींत आहे. आजदेखील ह्या संस्थेचा सारा कारभार युरोपियन व लूझोइंडियन समाजाच्याच हाती असतो. हॉस्पिटलांतील हालचालीची माहिती पूर्वी दिलेलीच आहे. संस्थेची मुख्य कचेरी पणजी येथे भव्य इमारतींत आहे. १९२८ साली संस्थेची इस्टेट सुमारे ६६८ हजारांची असून साडे नऊ लाख रुपये शिलकी खात्यांत जमा होते. संस्थेचे नक्की उत्पन्न ३,५३,७४३ रुपये आहे. त्यांत इस्टेटीचे उत्पन्न ४०,७४७ रुपये असून केवळ लॉटरीचेच उत्पन्न ३,०४,८८८ रुपये आहे ! हॉस्पिटलांतील रोग्यांत लुझोइंडियनांचीच वरणी इतरांच्या अगोदर लागते.. हास्पिटलप्रीत्यर्थ ६६,९८० रु., दोनही आश्रमांकडे साडे एकोणतीस हजार, गरीब मुलींना हुंडा, पेन्शनें, इत्यादि कार्यां ६१ हजार, शिक्षणासाठी ३१॥ हजार असा खर्च होतो. एक हास्पिटल खेरीज करून इतर बाबींत मिझेरकोर्दीमुळे केवळ लुझोइंडियन समाजाचाच फायदा होतो म्हटल्यास तें सत्यास मुळीच सोडून नाही. मडगांवची ओपीस्युः-ह्या संस्थेची स्थापना बरीच अलीकडे झाली. इ. स. १८६७ साली, मडगांवचे पाद्रि आंतोन्यु जुवांव द मिरांद यांनी, अनाथ अपंगांना व्याजांतून मदत करण्यासाठी म्हणून सासष्ट कोंसेल्यांतील रहिवाशांमध्ये एक फंड उघडला. त्या फंडास त्यांनी १३००० असर्फी मिळविली. व लागलीच संस्थेच्या इमारतीच्या पायाचा दगड बसवून १८६८त इमारत पूर्ण केली. इ. स. १८७२ त तिची नियमावली पास झाली व १८७८ साली संस्थेला