पान:गोमंतक परिचय.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय १०६ गप्पा टप्पा मारायच्या, नाच तमाशे व बैठे खेळ खेळायच्या, सोशल क्लबसारख्या संस्था मात्र कोठे कोठे दिसतात. परंतु त्याही रुटुखुटु चाललेल्या दिसतात. नाही म्हणायला " सांताकाझ द मिझेरिकोर्द" (पणजी); ओइपीस्यु दु साग्रादु कुरासांव द मारीय (मडगांव); आझीलु द नोस्सा सेन्योरा दुजू मिलानिश (म्हापशें); आसिश्तेंसिय आउझ् इंदिजेंतिझ इ आ इंफासिय दिज्व्हालीद द गोअ (पणजी); आसोसियासांव द कारिदादि (लोटली); व पांव द सांतु आंतोनियु (कुडतरी) या संस्था चांगल्या चाललेल्या आहेत. परंतु यांपैकी बहुतेकांचा योगक्षेम सोडतींसारख्या जुगारावरच चाललेला असतो हे त्याविषयी पुढें विशेष माहिती देण्यात येईल, तेथे दिसून येईल. स्वार्थत्यागाची प्रवृत्ति या समाजांत अगदी कमी आहे म्हणायचे दुसरें प्रमाण हे की, गोव्याच्या कोणत्याही शहरी सोडतविक्यांच्या मागोमाग भिक्षेकन्यांची जी हुल्लड प्रवाशांना सतावीत असते, ती केवळ ख्रिस्ती समाजांतीलच असते. हिंदू मिक्षेकरी गोव्यांत मुळीच नाहींत म्हटले तरी चालेल. कारण हिंदुसमाजांतील अनाथादिकांना, त्यांच्या कोठल्या ना कोठल्या तरी नातेवाइकाची नेहेमी मदत असते. जे हिंदु भिकारी गोव्यांत दिसतात ते ब्रिटिश हिंदुस्थानांतील आयातीच्या मालापैकीच असतात. असे धंदेवाईक भिक्षेकरी इकडे दिसत नाहीत. परंतु संपन्न मुलाच्या, भिक्षा मागत फिरणाऱ्या म्हाताऱ्या आया, अशिक्षित ख्रिस्ती समाजांत अगदी सामान्य चीज आहे. त्यांत भिक्षा मागणारांना जसें वाईट वाटत नसते, तसें संपन्नावस्थेतील त्यांच्या नातेवाइकांनाही वाटत नसते. आणि ख्रिस्ती समाजाच्या संपन्नावस्थेशी हिंदुसमाजाची सांपत्तिक परिस्थिति ताडून पाहिली, म्हणजे हा विरोध विशेष खुलून दिसतो. मिझेरिकोर्दीची हालहवालः-आफोंस द आल्बुकर्क याने या संस्थेची स्थापना इ. स. १५११ त केली. पोर्तुगालच्या वैभवकाली जे शिपाई व योद्धे आपल्या राजाकरितां व धर्मासाठी इकडे धारातीर्थी देह ठेवीत, त्यांच्या अनाथ विधवांना व संततीला मदत करण्याच्या हेतूनेच ती स्थापली गेली होती. अर्थातच त्यांतून पूर्वी केवळ युरोपियन व लूझोइंडियन समाजालाच कायती मदत मिळत असे. आशिया व आफ्रिका खंडांत, जेथे जेथें पोर्तुगीजांनी मुलूख मिळविला होता, तेथे तेथे ह्या संस्थेच्या शाखा उघडल्या गेल्या जाऊन व एकेकाळी त्यांची संख्या २५ पर्यंत पोंचली होती. पुढे पोर्तुगीजांच्या साम्राज्याला जसजशी ओहोटी लागली, तसतशा ह्या शाखाही हळुहळू नामशेष होऊन आज मुख्य संस्थाच