पान:गोमंतक परिचय.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०५ प्रकरण चवथे. थोडाफार तिसवाडकरांतही दिसून येत असतो, तो बारदेशकरांत तेवढा प्रखर दिसत नाही. सासष्टकरांतील चाड्डे व ब्राह्मणवर्गातून, गेल्या शतकाच्या अखेरीस ज्या परस्परविरोधक चळवळी झाल्या, त्यांचा प्रतिध्वनि तिसवाडीतही उठला. पण बारदेशांत त्याची फारशी हांक पोंचली नाही. सारे हिंदुस्थान या वर्गाने आक्रमून सोडले आहे. खालच्या परिस्थितीतून, अडचणींना न जुमानतां, स्वपराक्रमाने वर येण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीला जोड मिळालीच तर हिंदुस्थानांत मारवाडी समाजाची व युरोपियन समाजांत यहुद्यांचीच मिळेल, इतका हा समाज कार्यक्षम व उद्यमशील आहे. कोणत्याही गोमंतकीयास परदेशांत मदत करण्यास, यांच्या इतक्या तत्परतेने पुढे होणारे दुसरे ख्रिस्ती विरळाच दिसतील. - सासष्टकरांचे धर्मपरावर्तन, कुटील नीतींत चाणाक्याचाही परात्पर गुरू शोभणाऱ्या, जगप्रख्यात अशा जेसुइट कंपनीमार्फत झाले आणि पुढे दोन शतकेंपर्यंत त्यांचे शिक्षण देखील जेसुइटांच्याच देखरेखी खाली झाले होते. शिवाय जात्याच ह्या लोकांत हृदयापेक्षां बुद्धि विशेष प्रबल असल्यामुळे, हा विभाग हिंदुसमाजाला विशेष वक्रदृष्टीने पाहणारा, त्यांच्या चळवळींना शक्य तेवढे अडथळे व आणतां येतील तेवढया अडचणी आणणारा आणि राष्ट्रीयत्वपरांग्मुखतेंत अग्रगण्य असा आहे. या विभागाचा विचार करतांना त्यांतील जातिभेद लक्ष्यांत घेतल्याशिवाय राहणे शक्य नाही. सामान्यतः चाड्डो हा ब्राह्मणांपेक्षां बुद्धिमत्तेत कमी, विशेष भावनाप्रधान व एक धार्मिक बाबत सोडल्यास इतर बाबींत मोकळ्या दिलाचा असतो आणि ब्राह्मण हा आंतल्या गांठीचा, जवळ जवळ उच्च मनोवृत्तींना पारखा, कमी आतिथ्यशील, असा असतो. देशभाषा जी कोंकणी तिला उत्तरोत्तर विसरून जाऊन पोर्तुगीज भाषा कवटाळण्यांत याच्या इतका कडवा ख्रिस्ती दुसरा सापडायचाच नाही. उद्यमशीलतेंत हा समाज आपल्या बारदेशकर किंवा तिसवाडकर बांधवांपेक्षां बराच खाली आहे. परंतु गोमंतकीय सरकारी नोकऱ्यांतून याच समाजाने आघाडी मारलेली आहे. धार्मिक कडवेपणांत सासष्टकरांना मुसलमानांचीच उपमा शोभली तर शोभेल. तिसवाडकर ख्रिस्ती हा काहीसा बारदेशकरांस जवळ असतो म्हणजे बारदेशकर व सासष्टीकर यांच्यांतील स्वभाव गुणाचें मध्यमस्थान तिसवाडकरांत दिसून येते. सार्वजनिक कार्येः-सार्वजनिक काय ख्रिस्ती समाजांतून फारशी दिसून येत नाहीत. स्वार्थत्यागाचे वळणच या लोकांना फारसे नाही, म्हटले तरी चालेल.