पान:गोमंतक परिचय.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय. १०४ दुसरा महत्वाचा विशेष म्हणजे नैतिक बंधनाच्या शैथिल्याचा होय. एका बाजूने पाद्री व अविवाहित पुरुषांचा भरणा आणि दुसरीकडून हुंड्याच्या जबऱ्या मानामुळे प्रौढा कुमारिकांची फुगलेली संख्या; भरीला स्त्रीपुरुषमिश्र समाजरचना, व तिचे ब्रयांक, बॅडी, बॉल, इत्यादि सहकारी, आणि पुरवणीदाखल पुरुषवर्गाच्या परदेशगमनामुळे उत्पन्न झालेली परिस्थिति ! तेव्हां " एकेकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयं"?! : कांहीं थोडेसेच युरोपियन किंवा देशी दारू विकणारे व घड्याळे, पुस्तकें किंवा चिल्लर ऐषआरामाच्या चिजा यांचे थोडेसे व्यापारी वगळले, तर गोव्यांतील व्यापाराकडे हा समाज फारसा वळलेला दिसून येत नाही. निर्गतीपैकी मीठ, नारळ वगैरे माल, व आयातीपैकी, खाद्य जिन्नस, वस्त्रपात्र, इत्यादि मालाचा व्यापार बहुतांशी, नव्हे तर एकदोन किरकोळ अपवाद सोडून दिले, तर सर्वांशी ख्रिस्तीतरांकडेच एकवटला आहे. तरीपण व्यापारी सद्गुण समाजांत मुळीच नाहीत, असें म्हणता येत नाही. कारण, अवघ्या तीस वर्षांमागे वस्त्राप्रावरणाचा बराचसा व्यापार बारदेशकर ख्रिस्त्यांकडेच होता. शिवाय आफ्रिका खंडांत बऱ्याच ठिकाणी, या समाजांतील लोकांनी मोठमोठ्या पेढया अजूनही संपन्न रीतीने चालविल्या. आहेत. जाम । स्वभाव वर्णन:-या दृष्टीने विचार करतांनां बारदेशकर, तिसवाडीकर व सासष्टकर, असे प्रथमतः तीन विभाग पाडावे लागतात; व तसे ते पाडले तर, बारदेशकर सामान्यतः मोकळ्या दिलाचा, धार्मिक बाबतींत कमी कडवा, सद्भावनाप्रधान व तीनही विभागांत विशेष उद्यमशील असा असतो. युरोपियन संस्कृति या विभागाने उचललेली असली, तरी तिच्या स्वीकाराने त्याची दृष्टि, तेवढी दिपलेली दिसून येत नाही. साऱ्या ख्रिस्ती समाजांत बारदेशकर विशेष उत्साही व आतिथ्यशील दिसतो. इतरांपेक्षां याच विभागाचें लक्ष्य इंग्रजी शिक्षणाकडे अगोदर वळले. त्या शिक्षणाचे कार्यक्षेत्र में ब्रिटिश हिंदुस्थान, तेथे संख्याबद्धतेनें जाणाऱ्यांतही हाच विभाग प्रमुख आहे. कांहींसें त्यामुळे व कांहींसें ख्रिस्तीकरण होतांना व तदुपरही पोर्तुगीज शिकतांना, दोमिनिकान व फ्रांसिश्कान ह्या, त्यांतल्या त्यांत कमी कडव्या, ख्रिस्ती सांप्रदायांकडे त्यांचा प्रांत संपविला गेला असल्याने, हे गुण त्यांच्यांत आले असावे, असा लेखकाचा कयास आहे. केवळ बुद्धिमत्ताच घेतली, तर सासष्टीकर ख्रिस्ती सर्वांत श्रेष्ठ आहेत. ख्रिस्ती धर्मस्वीकारास ४०० वर्षे झाली असतांही, जो जातिभेदजन्य गोंधळ सासष्टकरांत किंवा