पान:गोमंतक परिचय.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०३ प्रकरण चवथे. नाण्याची दुसरी बाजूः-इतके झाले तरी प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू ही असतेच. त्याप्रमाणे या नाण्यालाही ती आहे. ख्रिस्ती समाजाचा सर्वांत मोठा दोष म्हणजे तो समाज, स्वदेश, स्वभाषा, पूर्वपरंपरा, इत्यादि राष्ट्रीय सद्गुणांस पारखा झालेला आहे हाच होय. एवढी मोठी प्रचंड अशी स्वदेशीची लाट १९०८ सालीं साऱ्या हिंदुस्थानांत उसळली व महात्मा गांधीजींनी अलीकडे ती खेडोखेडी देखील पोंचविली. परंतु आमच्या गोमंतकीय ख्रिस्ती समाजांत स्वदेशीचें व्रत पाळणारा इसम औषधालाही सांपडावयाचा नाही. अव्वल अमदानींत झालेल्या धर्मच्छलामुळे त्यांच्यावर जो प्रहार झाला, त्याने जणुं काय त्यांची पूर्वपरंपराच तोडली गेली. आज पूर्वसंस्कृतीची काडीइतकी देखील जाणीव त्या समाजांत राहिली नाही. त्यामुळे हा समाज भूतकाळशून्य बनून त्याला भविष्यकाळही नाहीसा झाला आहे. एकादी रेषा वाढवायची असली, तर तिचे कोणतेही दोन बिंदु मुक्रर करून त्यांच्या अनुरोधानेच ती वाढविता येते. आणि ह्या उभय बिंदूमधील अंतर ज्या मानाने मोठे असेल, त्या मानाने पुढील वाढही विशेष सुसूत्र निघत असते. आमच्या ख्रिस्ती समाजाला, केवळ वर्तमानकाळच तेवढा आहे म्हटले तरी चालेल, इतके ते स्वत्वशून्य आहेत. मराठी भाषेविषयीं, मराठी शिक्षणाविषयीं, हिंदुसमाजाचे जे प्रयत्न त्यांच्या दृष्टोत्पत्तीस येतात त्यांचा संबंध ते क्रांतीशी देखील लावू शकतात, एवढे सांगतांच या त्यांच्या स्थितीविषयीं विशेष सांगणे नको. आणि म्हणूनच त्यांच्या चळवळी, मग त्या सामाजिक असोत किंवा राजकीय असोत, पण केवळ व्यक्तिगत हितापलीकडे अशा त्या फारशा जाऊ शकतच नाहीत. इतकेच नव्हे, पण सामायिक हितसंबंधाची चळवळ करणारा एकादा माणूस त्यांच्यांत निपजलाच, तर त्याला समाजांत पुढाऱ्याची जागा न मिळतां, उलट विरोधच होत असतो. आणि याचमुळे हिंदुसमाजाच्या पूर्वसंस्कृत्यनुसारी चळवळींकडे हे लोक संशयी दृष्टीने पाहत असतात व शक्य तेवढा विरोध करतात. युरोपियनांसारखे बनणे हे त्यांचे अंतिम ध्येय असते. उच्च शिक्षणासाठी पोर्तुगालात जाणाऱ्या विद्यार्थ्यांतून बरेचसे इसम पोर्तुगीज युवतींशी विवाहबद्ध होऊन परत यत असतात. व अशांचा संसारही तदनुरूप होत असतो. प्रस्तुत लेखकाला तर अशा कित्येक उदाहरणे माहित आहेत की, या असल्या विवाहानंतर नवऱ्यांचा भक्कम पगारही न पुरतां गोऱ्या पत्नीच्या थाटाच्या राहणीसाठी वडिलार्जित हजारों रुपयांची इस्टेट विकावी लागली आहे. या