पान:गोमंतक परिचय.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०१ प्रकरण चवथे. हजारांपर्यंत सहज चढते. आणि वरिष्ट नोकरीत प्रवेश झालेला नवरा मुलगा असल्यास त्याला ४० ते साठ हजार किंमत देखील पडते ! त्यामुळे ह्या समाजांत वृद्धा कुमारिकांचा भरणा व जरठ कुमारांची संख्या बरीच असते. संपन्न अशा कुटुंबांत ३।४ मुलगे असले तर त्यांतून एकादा तरी पाद्री असतोच. व एकादाच विवाहबद्ध झालेला दिसतो. इतर मुलगे वकीली किंवा नोकरी पत्करून अविवाहितच राहत असलेले दिसणे अगदी सामान्य आहे. त्याचप्रमाणे एकाददुसऱ्याच मुलीला विवाहसौख्य मिळते. कुटुंबांतील साऱ्याच मुलींची लग्ने झाल्याची उदाहरणे, संपन्न स्थितीत देखील फारशी आढळून येत नाहीत. याचे कारण हुंड्याची अडचण हेच असावें. लग्ने, धड अनुनय पद्धतीनेही होत नाहीत, किंवा धड वडिलांमार्फतही होत नाहीत. वडील मंडळीनें पसंत केलेल्या मुलीला, नवरा मुलगा एकाद्या बॉलमध्ये किंवा चर्चच्या उत्सवांत पाहतो व एकमेक एकमेकांना पसंत पडल्यास, वधूला वरपक्षीयांकडून मागणी घालण्यात येऊन हुंडापांडा ठरल्यावर मग वधुवरांना अनुनयाची परवानगी मिळते. अभिजात वर्गात असो किंवा खालच्या वर्गांत असो, पण विवाहमर्यादा बरीच वाढलेली आहे. रेजीश्त सिव्हिलचा कायदा झाल्यापासून तर, वयांत आल्याशिवाय विवाहच करतां येत नाही. परंतु त्यापूर्वी देखील सामान्यतः १८ वर्षे झाल्याशिवाय मुलीचें, व २५ वर्षांपूर्वी मुलाचे लग्नच होत नव्हते. आजला साधारणपणे वराची वयोमर्यादा २५ पासून ३५ पर्यंत असून वधूची २० ते ३० पर्यंत असू शकते. ___ उच्च शिक्षणाचा प्रसार या लोकांमध्ये बराच झाला आहे. डाक्टरी पास झालेल्या व धंदा करीत असलेल्या गोमंतकांतील २१६ डाक्टर्समध्ये ५०.५५ डाक्टर हिंदू आहेत. गोमंतकीय ५७ केमिस्टांतून सुमारे आठ दहाच हिंदू असतील. त्याचप्रमाणे वकिलीचा धंदा तर पूर्णपणे याच लोकांच्या हाती आहे. वरिष्ठ नोक-यांपैकी, न्यायखात्यांत या वर्गातील बार-अॅट-लॉ सुमारे ५० सांवर असून त्यांचा शिरकाव थेट पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टात सुद्धा झालेला आहे. गोमंतकांतील सरकारी नोकऱ्यांतून यांची संख्या, शेकडा सुमारे ७५ च्या वरच असेल. व एकंदर दहा खात्यांपैकी, आरोग्य रक्षण, तार व टपाल, जमीन मोजणी खातें, या तीन खात्यांचे मुख्याधिकारी याच वर्गांतले आहेत ! शिवाय ब्रिटिश हिंदुस्थान, केनिया, मोझांबिक. फारतर काय पण ब्राझीलपर्यंत या लोकांच्या सुशिक्षित वगान, - दनासाठी आक्रमण केले आहे. जगाच्या कोणत्याही देशांत महत्वाच शहर असें नसेल, की जेथे एखादा तरी गोमंतकीय ख्रिस्ती नाही. अशिक्षित