पान:गोमंतक परिचय.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय १०० ४०० वर्षेपर्यंत होतीच. शिवाय पाश्चात्य शिक्षणाचा लाभ देशी खिस्त्यांनां त्यांच्यापेक्षां पुष्कळ वर्षे पूर्वी मिळाला होता, त्यामुळे व धर्मसादृश्याने जेत्यांकडून मिळणाऱ्या थोड्याफार मदतीमुळे खिस्ती वर्ग प्रारंभापासूनच हिंदूंपेक्षा चांगल्या स्थितीत होता. ही गोष्ट वरील विवेचनावरून स्पष्ट दिसून येईल. ख्रिस्त्यांत झाले तरी अजूनही बेटीबंद असे ब्राह्मण, चाड्डो (क्षत्रिय व वैश्यांमुळे बनलेला), शूद्र व महार असे वर्ग आहेत. आणि सारे १९ वें शतकभर या वर्गांपैकी, पुढारलेल्या ब्राह्मण व चाड्डो या वर्गांत गोमंतकांतील राजकारणांत पुढे होण्याची स्पर्धा, उभय वर्गांच्या लूझोइंडियनाशी चाललेल्या सामन्याबरोबरच चालू होती. परंतु वरिष्टांशी भांडतांता, सांपडेल तेथें हिंदूंना खाली रेटण्याचे प्रयत्न मात्र या समाजांतून नेहेमी चालूच होते. धर्मामुळे, संस्कृतिस्वीकारामुळे व शिक्षणप्रसारामुळे, हा समाज 'पाखंडी' हिंदु समाजापेक्षां, युरोपियन जेत्यांनां साहजिकच जवळचा आहे. अर्थात्, जेथे जेथें हिंदूंविरुद्ध ख्रिस्ती असा लढा पडत होता, तेथे तेथे त्यांना त्यावेळी जेत्यांकडून मदतच मिळत गेली होती. ह्या परिस्थितीचा फायदा त्यांनी भरपूर घेतला व प्रगतीचें शिखर गांठले. आजला गोमंतकीय स्पर्धाक्षेत्रांतून युरोपियन मुळीच दिसत नाहीत; आहे त्याच परिस्थितीत समाधान मानण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मानण्याइतका लूझोइंडियन समाज निष्क्रिय झाला आहे. अर्थातच खिस्ती समाजांतील ब्राम्हण व चाड्डो त्या दोन वर्गांतच गेल्या वर्षांतून झगडा चाललेला होता. हिंदुसमाजाच्या दृष्टीने पाहिल्यास, सारी सत्ता ह्याच वर्गाच्या हाती एकवटली होती व अजूनही तिला फारसा खो बसला नाही. आणि म्हणूनच सामाजिक परिस्थितीचा विचार करतांना, हिंदु व खिस्ती यांतून हे अंतर दिसून येऊन तदनुसार विभाग पाडावे लागत आहेत. खिस्त्यांच्या चालीरीति व संपन्नताः-सूक्ष्म दृष्टीने पाहिले असतां, ख्रिस्तीधर्म स्वीकारामुळे या समाजाने मुळच्या साऱ्याच चालीरीति सोडल्या आहेत असें दिसत नाही. जातिभेद, रोटिव्यवहाराच्या बाबतींत नसला तरी बेटिव्यवहारापुरता तरी अजूनही कडकपणे पाळला जातो. हुंड्याची चाल तर त्या समाजांत इतकी बद्धमूल झालेली आहे की, सामान्यतः दोन तीन हजार रुपये उत्पन्नाच्या कुटुंबांतील सुशिक्षित मुलाला, कमीत कमी दहा बारा हजार रुपये हुंडा द्यावा लागतो. त्यांतही मुलगा जर उच्च शिक्षण घेतलेला असला, सरकारी किंवा व्यापारी नोकरीत त्याला मध्यम प्रतीची जागा जरी असली, तर हे मान वीस पंचवीस