पान:गोमंतक परिचय.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण चवथे. करून कैदेत घातले होते. इतकेंही असले तरी ख्रिस्ती वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीस अठराव्या शतकाच्या सुरवातीपासूनच खरा प्रारंभ झाला होता. शिवाय युरोपियन किंवा लष्करी लूझोइंडियन समाजाच्या विरुद्ध चाललेल्या झगड्यांत त्यावेळच्या ख्रिस्ती धार्मिक संस्थांनी आणि आर्चविषपनी, ख्रिस्त्यांना वेळोवेळ मदत केली होती ही गोष्टही लक्ष्यांत घेतली पाहिजे. परंतु वर सांगितल्याप्रमाणे, जेसुईट कंपनीची व इंकि झिसावांची नांगी मार्केझ द पोंबालने मोडतांच, लूझोइंडियन समाजानें गोमंतकांत धुडगूस घालण्यास प्रारंभ केला. पुढे माशेलांतील बंड झाल्यावर लूझोइंडियन समाजाचे प्राबल्यही लष्कराच्या नाशाबरोबरच लयास गेलें व गोमंतकांत सगळीकडे देशी ख्रिस्त्यांचाच बोलबाला झाला. एका काळी प्रबळ असलेल्या लूझोइंडियन वर्गाचे लोक, आजला साऱ्या गोमांतकांत मिळून फारतर दोन हजारांच्या आत बाहेर आहेत. परंतु “ मिझेरिकोर्द " सारखी अत्यंत सधन अशी संस्था या वर्गाच्या पाठीशी असल्यामुळे व अजूनही गोमंतकीय लष्करांत पूर्वपरंपरेस अनुसरून, त्यांचीच वर्णी विशेष लागत असल्याने, हा समाज आहे त्या स्थितीत जीवंत राहण्यास मुळीच प्रत्यवाय नाही. खावें, प्यावें, मजा करावी व युरोपियन समाजांत मिसळू पाहून इतरांशी तुच्छतेने वागावें, हा या समाजाचा आजचा क्रम आहे. तरी पण गतकालांत या समाजांतून चांगले चांगले लष्करी अंमलदार, वैद्य, राजनीतिनिपुण मुत्सद्दी, निपजले आहेत. बारांव द कुंभारजुव तोमाझ मौरांव, हा त्यांच्यांत नामांकित विद्वान होऊन गेला. त्याच प्रमाणे खास पोर्तुगालांतील विद्वान यस द कैरोझ, रामाल्यू द ओर्तिगांव, ओलिव्हर मार्तीश इत्यादिकांच्या मंडळांत बरेंच महत्त्व मिळविलेले, फ्रेदेरिक दिनीझ द आयाल हेही या समाजांत नामांकित लेखक होऊन गेले. इ. स. १८९५ च्या सुमारास या समाजांतील एल्व्हीन द ब्रीत हे, खास पोर्तुगीज प्रधानमंडळांत, पब्लिक वर्क्स खात्याचे प्रधान झाले होते. देशी खिस्ती व त्यांच्यांतील वर्ग:-पोर्तुगीज अमदानीतील पहिले शतक दीड शतक युरोपियनांच्या प्राबल्याचे गेले, तर १७७४ पासून पुढे त्यांचे प्राबल्य नष्ट झाले व रणांगणांत लूझोइंडियन विरुद्ध देशी ख्रिस्ती, असे दोन पक्ष दिसू लागले. १८७० साली लूझोइंडियनांचे प्राबल्य नामशेष झाले. व देशी खिस्त्यांच्या सवत्या सुभ्याच्या युगास प्रारंभ झाला. तथापि दरम्यानच्या काळांत देशी ख्रिस्त्यांना वरील वर्गाकडून मार बसत असतांनांच, खाली जेंतींवाचा (हिंदूंचा) वर्ग तुडवायला मिळत होता. हिंदूंची असहाय स्थिति तर जवळ जवळ