पान:गोमंतक परिचय.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय दुसरा तिला मगरमिठी मारून बसलेला; एकानें जगाचें घर केलेले तर दुसरा घराचेच जग बनविणारा; एक जातिभेद केवळ शरीरसंबंधापुरताच पाळतो तर दुसरा रोटिबेटी बंद; एकाला सामुदायिक हितसंबंधाची फारशी परवा नसण्याइतकी सुस्थिति प्राप्त झालेली, तर दुसऱ्याला सामुदायिक हितसंबंधांकडे लक्ष दिल्याशिवाय वैयक्तिक हितसंबंध पूर्ण झाले, असे वाटत नाहीं; एवंच हे दोन समाज आमूलाग्र विसदृश आहेत. तेव्हां सामाजिक परिस्थितीचे वर्णन करतांना, हे भेद दृष्टीसमोर ठेवूनच तें केले पाहिजे. पहिला समाज, ख्रिस्ती बनलेला, किंवा बनविलेल्या लोकांचा, आणि दुसरा, आपल्या पूर्वपरंपेस व धर्मास कवटाळतांना शक्तिपात करून घेतलेला हिंदुसमाज, हे ते दोन समाज होत. जना विभाग पहिला. निगल खिस्ती समाज. खिस्ती समाजांतील पोटवर्ग-लूझोइंडियनाचे प्राबल्यः-मागे राजकीय परिस्थिति वर्णनांत " काश्तीस" ( स्थायिक झालेले युरोपियन )" मिश्तिस" (मिश्रसंतती) “कानारी" ( बाटलेले ख्रिस्ती ) व “जेंतिव्ह" ( हिंदु) असे चार वर्ग असल्याचे आम्ही सांगितलेच आहे. बाटलेल्या ख्रिस्त्यांना मूळच्या युरोपियनांनी बाटाबाटीच्या काळी फारच चांगले वागविले व त्यांची सांपत्तिक स्थिति सुधारण्याइतका खुराक, न बाटलेल्या प्रजेच्या संपत्तींतून, त्यांनां चारण्यांत काडीमात्र कसूर केली नाही. परंतु, पुढे जसजसे हे नवख्रिस्ती पुढे येऊ लागले; तसतसा पोर्तुगालमधून राज्यरक्षणार्थ येणाऱ्या युरोपियनांना त्यांचाच हेवा वाटू लागून, सतराव्या शतकापासून रैनाइश व काश्तीस युरोपियन याचा एक आणि "मिस्तिस" व " कानारी" यांचा दुसरा, असे दोन निरनिराळे तट पडल्यामुळे सतरावें शतकभर मिश्तीस व देशी ख्रिस्ती यांना जेत्यांनी एका शिक्षणा. शिवाय ( व तेंही धार्मिक संस्थांतून मिळालेलें,) इतर राजकीय, सामाजिक वगैरे बाबतींत तुच्छतेनेंच वागविले होते. पुढे हे जित जेत्यांचे भेद १८७४ त माय द पोंबालनें नष्ट करतांच ख्रिस्त्यांनी डोके वर केलें. तथापि राजसत्ते, त्यावेळ प्रमुख आंग जे लष्कर, त्यांत मिश्तिसांचेच प्राबल्य असल्यामुळे. १७७४त ते ११३५ पर्यंत देखील देशी ख्रिस्त्यांना आपल्या उद्धाराची वाट धक्केचपाटे खाऊ काढावी लागली. लष्करी सत्तेच्या प्राबल्यामुळेच लूझोइंडियनानी, पहिलेच हिंदी गव्हर्नर बॅनोर्दु पॅरिश द सीलव्ह यांना, एका वर्षाच्या अवधीतच पदच्युत