पान:गोमंतक परिचय.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण चवथे. त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी करणे, मानवी मनाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे ! असे ते आम्हां गोवेंकरांचे पूर्वज होते ही गोष्ट प्रस्तुत लेखकाला तरी अत्यंत अभिमानाची व भाग्याची वाटते ! SISTE तसेंच ख्रिस्ती धर्म स्वीकारणे बाह्यतः भाग पडले असतां; स्वजनांनी दूर लोटलें असतांना; तिरस्करणीय व उपेक्षणीय परिस्थितीत चारशे वर्षे, चार शतकेंपर्यंत ज्यांनी गुप्त रीत्या आपापले कुलधर्म राखले; चारशे वर्षे ज्यांनी आचारभ्रष्टतेचें वारे आपल्याला लागू दिले नाहीं; एवढा अखंड काल की, ज्या अवधीत मोंगल आले, चढले व नामशेष झाले, मराठेशाही उत्पन्न झाली, आसेतु हिमाचल गाजली व विराम पावली, अमेरिकेसारखें अभिनव राष्ट्र निर्माण झालें, एवढया प्रचंड कालविभागापर्यंत त्यांनी अप्रतीम चिकाटीनें, अवर्णनीय प्रेमाने आणि अद्वितीय भक्तीनें, हिंदुधर्मावरील व हिंदुसंस्कृतीवरील आपली निष्ठा जिवंत ठेविली, त्या गावडे समाजाची धन्यता !...ती वर्णन करायला केवळ हृदयाची मूक भाषाच झाली तर समर्थ होईल ! आणि हे आमचे बंधु आहेत असें म्हणण्याचे महद्भाग्य आमचेच आहे ! गोमंतकीयेतर हिंदूने हा इतिहास लिहिला असता, तर त्याने देखील हेच उद्गार काढले असते. परंतु भाषेच्या परकीपणामुळे असो किंवा इतर अडचणींमुळे असो, आजवर महाराष्ट्रीयांचे लक्ष्य त्याकडे मुळीच वेधले नव्हते. त्याचमुळे हे काम आमचे आम्हांलाच स्वीकारावे लागले. प्रकरण ४ थे. सामाजिक परिस्थिति दोन विभागः-गोव्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करतांना, तुल्यसंख्य व विसदृश संस्कृतीचे असे त्यांत दोन विभाग आहेत, ही गोष्ट प्रामुख्याने नजरेसमोर आल्याशिवाय राहत नाही. एक युरोपाभिमुख तर दुसरा हिंदी राष्ट्राभिमुख; एक पोर्तुगीज व इंग्रजी शिक्षणाने मंडित तर दुसऱ्याचे लक्ष पाश्चात्य विद्यकडे लागल्यास पुरतीं तीस वर्षे देखील झाली नाहीत; एक आर्थिक दृष्ट्या संपन्न, तर दुसऱ्याला उद्यांचीच फिकीर ! एक जुनी परंपरा विसरलेला तर