पान:गोमंतक परिचय.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय लोकांनी प्रारंभी प्रारंभी तरी केवळ अपरिहार्यतेमुळेच व मोठ्या जुलुमानेच स्वीकारल्या असाव्या. युरोपियनांशी सहवास होतांच कालांतराने मूळची नावड जाऊन प्राप्त परिस्थितीच त्यांना आंगवळणी पडून बरी वाढू लागली व तिच्या विरुद्ध येणाऱ्या बाबींना ते शत्रुत्वाने लेखू लागले. याच Assimilacao च्या धोरणामुळे गोव्यातील राज्यकारभारांत देशभाषेला जागा नाहीशी झाली आहे; याच धोरणामुळे आमची पूर्वपरंपरा समजून घेण्याचे साधन जो हिंदुस्थानचा इतिहास, त्याला शिक्षणांत स्थान नाहीं; याच धोरणामुळे गोव्यांतील मराठी शिक्षणाकडे सरकारने दुर्लक्ष्य केलें आहे; याच धोरणामुळे, देशभाषेच्या संवर्धनासाठी चाललेल्या हिंदूच्या प्रयत्नांकडे आमचे ख्रिस्ती बंधु संशयात्मक दृष्टीने पाहत असतात; याच धोरणामुळे प्रारंभींच्या काळी गोमंतकांतील कुलस्त्रियांवर बाटून पुनर्लग्ने करण्याचा घोर जुलूम ओढवला. संस्कृतींची मुख्य आधारस्थाने म्हणजे आचारप्रधानधर्म व भाषा हीच होत. या उभय बाबींवरच हल्ला झाल्यामुळे त्यावेळचा गोमंतकीय समाज अगदीच नामोहरम होऊन गेला. पोर्तुगीज संस्कृति स्वीकारणारांना मात्र त्यांचे राज्य हिंदूपेक्षां पुष्कळच फायदेशीर झाले. मोठमोठ्या हुद्याच्या जागा, संपन्न अशी आर्थिक स्थिति, मुळच्या हिंदुधर्माच्या मानाने पाहिल्यास, आहार विहाराची अंतीम सीमा या एका धर्मांतरानें व संस्कृतिस्वीकाराने त्यांना प्राप्त झाल्या. "स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी कधी जन्मती":-एका बाजूनें सत्तेचा पराकाष्ठेचा जुलूम व दुसरीकडून आत्यंतिक प्रलोभन, ही शस्त्रे जय्यत असतांना त्यांना न जुमानतां ज्यांनी आपल्या धर्माची, आपल्या देशाची, आपल्या भाषेची, आपल्या आचारांची व आपल्या परंपरेची कास सोडली नाही: भुरट्या चोरांसारखे लपून, निराश्रित परागंदांसारखे धावपळ करीत, हालाहालांत देखील आपली संस्कृति जतन करण्यांत, ज्यांनी मृत्यूही आनंदाने पत्करला: रानावनांतून देव हिंडविले; देवाधासाठी महारांची देखील याचना केली. देशत्याग व सर्वस्वत्यागही पत्करला, त्यांची धन्यता काय वर्णावी ! . आणि इतकाही जुलूम सहन करून, सोट्याला न जुमानतां आणि प्रलोभनाला बळी न पडतां, देशांतच चोरून राहून ज्यांनी स्वत्वरक्षण केले; " हिंदूकडून मक्ते घेऊन खिस्त्यांस दिल्यास त्यांत तिजोरीचीच नुकसानी आहे" अशी आपल्या विगारीची कबुली खुद्द जुलुमी राजसत्तेच्या तोंडूनच वदविली; त्यांच्या चिकाटीची. त्यांच्या धैर्याची, त्यांच्या स्वत्वनिष्ठेची, त्यांच्या चिवटपणाची आणि