पान:गोमंतक परिचय.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण तिसरें. बंदीच्या हुकुमावर केलेलें अपील, पोर्तुगालांतच धूळ खात पडले होते. तेव्हा सासष्ट प्रांताच्या त्या वेळच्या जज्जसाहेबांच्या मार्फत, नुक्तेच परलोकवासी झालेले, डॉक्टर आंतोनियु जुजे दा आल्मैद, या रिपब्लिकन देपुतादाकडे (पार्लमेंटच्या प्रतिनिधीकडे) हिंदूंनी धांवणे केले. त्यांनी पार्लमेंटांत भाषण करून ह्या प्रकाराकडे सरकारचे लक्ष खेचलें आणि अपिलाचा निकाल हिंदूंच्या बाजूनें झाला. आणि हा निकाल ग्याझेटांत प्रसिद्ध होतो न होतो, इतक्यांतच पोर्तुगालांत क्रांति होऊन रिपब्लिक स्थापन झाल्याची सुवार्ता आली. उपरोक्त जज्जसाहेब कौसरु दा कॉश्त हे पहिलेच रिपब्लिकन गव्हर्नर झाले. डॉक्टर आल्मैद हे मुख्य प्रधानकीच्या आसनावर पोंचले. डॉ.आल्मैद यांनां रिपब्लिकच्या प्रेसिडेंशल चेअरचा मानही पुढे मिळाला. असो. असा हा आमचा धार्मिक व सामाजिक इतिहास आहे. रिपब्लिकच्या स्थापनेनंतरच्या १९ वर्षांच्या अवधींत हिंदुसमाजाने काय केलें तें पुढें सामाजिक परिस्थितीत वर्णन केलेली त्यांची सद्यःस्थितीच सांगेल. पोर्तुगीज राज्यकारभारांतील मुख्य धोरणः-जीत राष्ट्रावर आपले जू ठेवणाऱ्या जेत्यांनी, राज्यकारभाराची दोन धोरणे ठेवलेली आजवर दिसून येतात. Assimilacao व Sujeicao हीच ती दोन धोरणे होत. आपली संस्कृति जीत राष्ट्राला स्वीकारावयाला हरएक उपायांनी भाग पाडावयाचें, या धोरणाला पहिले नांव आहे. तर जीत राष्ट्राची संस्कृति राखून त्यावर सत्ता चालवायची व संपत्तिशोषण करावयाचे, हे धोरण Sujeicao ह्या सदराखाली पडते. जीत राष्ट्राची भाषा, धर्म, रीतिरिवाज, इत्यादि नष्ट करून त्याला आत्मसात् करावयाचें Assimilagao चे धोरणच पोर्तुगालने आपणासमोर ठेविलें होते. व त्याला अनुसरूनच अव्वल पोर्तुगीजशाहीपासून आपल्या प्रजाजनांवर यांनी अनन्वित जुलूम केले. आमच्यांतील सोंवळ्याओवळ्याच्या, भ्रष्टाभ्रष्टतेच्या, इत्यादि कल्पना हिंदुसमाजाच्या दुर्दैवामुळे त्या काळी अत्यंत कडक होत्या. त्यांच्या योगानें जुलुमाने देखील परधर्मांत गेलेल्या आमच्या बंधूंना, आम्हीच आमचे शत्रू बनविलें. एकदां बाटला की तो कायमचाच बाटला. आणि पुष्कळदां हें बाटणे पण कसे ? एखाद्या गल्लीत ख्रिस्त्यांनी टाकलेल्या खऱ्या खोट्या हाडकानें खाल त्या वेळी, गल्ल्याच्या गल्लया, नव्हे-गांवची गांवें, ख्रिस्त्यांनी नव्हे, तर आम्हीच बाटविली आहेत. - स्वदेशाऐवजी पोर्तुगाल हा देश, स्वभाषेऐवजी पोर्तुगीज भाषा ही भाषा, देशी रीतिरिवाजांऐवजी राज्यकर्त्यांचे रीतिरिवाज, इत्यादि बाबी ह्या धर्मातरित