पान:गोमंतक परिचय.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय धर्मद्वेषाच्या विझत्या कुंडांत पाद्रीमंडळी हरघडीस नव्या समिधा टाकीतच होते. आणि त्यांना उत्तर देण्याचीही सुराणी नव्हती. कारण उत्तर दिले गेल्यास सरकारी धर्माच्या अपमानाचा गुन्हा पदरी पडत होता. धर्मकारणाचे प्राबल्य खुद्द पोर्तुगालांतून निघून गेले होते, परंतु पोर्तुगीज संस्कृतिसंवर्धनाच्या नावाखालीं वसाहतींतून त्याचा उपयोग करावयाचे धोरण मुत्सद्यांनी अंगिकारले होते; गोव्याच्या गव्हर्नरच्या सल्लागार मंडळांत आर्चबिषपची जागा अजूनही अढळ होती; ज्या कौन्सिलकडून गव्हर्नरच्या गैरहजिरीत राज्यकारभार चालत असे, त्यांत देखील आर्चबिषपला जागा होती; अर्थात् मूळच्या जुलमाची तयारी होतीच. तथापि परिस्थिति मात्र बदलली होती. Ultramar सारखी ख्रिस्ती वर्तमानपत्रंच मधून मधून ख्रिस्ती पायांवर टीका करून हिंदूंना क्वचित सांवरून धरीत होती. परंतु Ultramar वर आर्चबिषपनी बहिष्कार पुकारला; गव्हर्नर जोआकी जूजे माशादु यांनी जगद्गुरूंना आमंत्रण करून, आपणासमोर त्यांचे समान दर्जानें स्वागत करून सहिष्णुतेचा धडा घालून दिला. त्यामुळे जुलुमांचे स्वरूप थोडेसे सौम्य झालें होतें. ख्रिस्ती. वर्तमानपत्रांतून वेळोवेळ हिंदुदेवतांची निंदा केलेले लेख येऊ लागले. खिस्ती लोक हिंदुदेवतांची निंदा करण्याची एकही संधि गमावीत नसत, हिंदूंच्या तक्रारींस न जुमानतां लोलये (काणकोण) येथील श्री केशवाच्या देवालयाजवळच ख्रिस्त्यांनी चापेल बांधलें; बांदिवडे येथील देवालयांच्या मधोमध असणाऱ्या उंच टेकडीवर देवालयांनां जणुं काय दटावीतच आहे असे दिसणारे दुसरें चापेल उद्भवलें; हिंदूंच्या धर्मगुरूंना छत्र चामरादि चिन्हें वापरून रस्त्यांवरून जाण्याची बंदी होऊ लागली; हिंदूंचे जे रथसप्तमी, चैत्रीपौर्णिमा, इत्यादि उत्सव होत, त्यांना पणजी येथे वारंवार अडथळे येऊ लागले; नेरूल येथे होणाऱ्या श्रीरामनवमीच्या उत्सवाला घातलेला मंडप देवळाच्या आकाराचा आहे, या सबबीवर तो उत्सवच बंद पाडण्यांत आला; के कोंसेल्यांतील कोठंबीच्या श्री महादेवाच्या देवालयाजवळ ख्रिस्ती पाद्रींनी प्रेत ठेवून देवालयाचा उपमर्द केला. इ. स. १९०७ च्या प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याने हिंदूंना प्राथमिक शिक्षक होण्याची बंदी झाली. पारोड्याच्या श्री चंद्रेश्वराची पालखी सीमोल्लंघनाच्या प्रसंगी पारोडें गांवांत येते. पण वाटेतच हिंदूंच्या तक्रारीस न जुमानतां, ख्रिस्त्यांनी अगदी रस्त्यावरच चर्च बांधले व त्या चर्चजवळून पालखी गेल्याने सरकारी धर्माची बेअदबी होते, या सबबीवर तेथील दसऱ्याचा उत्सवच बंद पडला. गर्व्हनर साहेबांनी दिलेल्या उत्सव