पान:गोमंतक परिचय.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण तिसरे. असा जो हुकूम पूर्वी अमलांत होता तो पुनः जारीने अमलात आणण्याबद्दल. खास राजेसाहेबांकडूनच फर्मान मिळविलें. - सनदशीर राज्यपद्धतींतः-जुलुमांचे विहंगम दृष्टीने अवलोकन करीत करीत, चर्चा, टीका, किंवा विवेचन न करतां, किंबहुना ह्या वेळोवेळच्या फर्मानांमुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीचे फारसें वर्णन देखील न करितां, आपण सनदशीर राज्यपद्धतींत पोंचलों आहों. “कार्त कोश्तितुसियोनाल'मुळे सरकारी धर्म जरी क्याथॉलिक ठरला होता, तरी इतर धर्मांना बंदी नव्हती, हे दुसरीकडे केलेल्या विवेचनावरून वाचकांना दिसून आलेच असेल. ( राजकीय परिस्थितिसदनशीर राज्यपद्धति पहा.) हिंदूंना विवाहादि संस्कार करण्याची मुभा मिळाली; त्यांच्या देवळांवर आतां हल्ले होत नव्हते; त्यांच्या पोरक्या मुलांना आतां बास्तिस्मा देण्यांत येत नव्हता; इंकिझिसांव तर नामशेष झाले होते; जेसुईट कंपनीसारख्या धार्मिक संस्था बंद होऊन त्यांनां पूर्वी दिली गेलेली, असोळणे, वेळ्ळी, आंबेली ही गांवें व इतर सारी इस्टेट सरकारने तिजोरीत जप्त केली होती; हिंदूंच्या देवालयांच्या व्यवस्थेचा कायदा (महाजन मंडळीचा कायदा ) सरकारांतूनच तयार होऊन अमलांतही आला होता; फार तर काय, पण इ. स. १८५१ साली त्यांच्या मनुस्मृतींतील कायद्याची कित्येक तत्वें गृहण करून सरकारने त्यांना कायद्याचे स्वरूप हिंदूंसाठी दिले होते; १८८० साली हा कायदा पुनः दुरुस्तही होऊन गेला होता. परंतु म्हणून कांही त्यांच्या मागचा धार्मिक ससेमिरा सुटला नाही. ___ ससेमियाची कारणे व स्वरूपः-सासष्ट प्रांतांतील असोत किंवा इतर प्रांतांतील असोत, परंतु सामान्यतः ख्रिस्त्यांचे शिक्षण थेट १९ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत तरी, केवळ पायांच्याच ताव्यांत होते. आणि विशेषेकरून गोव्यांतील शिक्षणाची मुख्य सूत्रं जेसुइटांसारख्या कडव्या, कुटीलनीतिनिपुण व अत्यंत असहिष्णु ख्रिस्त्यांकडेच एकवटली होती. हिंदू म्हटला म्हणजे तो त्याज्य; तो जेंतीव्ह; त्याचा धर्म म्हणजे सैतानाशी केलेला करार; त्यांचे रीतिरिवाज केवळ रानटी; तो प्रामाणिक असणे किंवा सद्गुणी असणे अशक्यच आहे; अशा समजुती शेंकडों वर्षे ज्या शिक्षणांत चालत आल्या, तें ज्यांच्या नसानसांतून भिनलेले होते, ते जेसुइटांचे उत्तराधिकारी अद्याप गोमंतकांत होतेच. मुळचा धामिक आवेश थंड होऊ नये म्हणून कोंफेसियोनार्य ( पातकोच्चाराची जागा ) व पूल्पितु ( व्यासपीठ ) ह्या उभय स्थानांवरून हिंदुधर्माची निंदा चालवून, मुळच्या