पान:गोमंतक परिचय.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय १६६३ रोजी जाहीरनाम्याने दिला. परंतु हिंदुलोक आतां स्वानुभवाने शहाणे झाले होते. अर्थात् फोंड्याच्या कामर जरालने (कोमुनदादींच्या महाल कौन्सिलने) धार्मिक हक्करक्षणाविषयी स्पष्ट वचन द्यावें असा अर्ज केला. त्या अर्जालाः "त्या महालांतील प्रजेला, वाटेल त्या प्रकारचे नवें बांधकाम करण्यास, व जुने मोडलेले दुरुस्त करण्याला बिनहरकत परवानगी आहे" .. असें वचन उत्तरादाखल मिळाले. वचनांतदेखील स्पष्टपणे देवळाचा उल्लेख करायला सरकार कचरलें ! कारण त्यामुळे पाद्रींचा क्षोभ अनावर झाल्यास काय करावे? परंतु परवानगीचा प्रच्छन्न हेतु मात्र तसा होता खरा. पुढे इ. स. १७७१ त आपले रीतिरिवाज, वैयक्तिक स्वातंत्र्य व इस्टेटीचा कबजा अखंड राखण्याची हमीही देण्यांत आली. याचा परिणाम अर्थातच जुन्या काबिजादींवर झाल्याशिवाय राहिला नाही. । उलटा वाराः मार्केझ द पोबालचे युगः–इ. स. १७७१ त देशी ख्रिस्ती व युरोपियन असे जे भेदभाव अजूनही सरकारांत मानले जात होते. ते ह्या सुप्रसिद्ध पोर्तुगीज मुत्सद्याने नष्ट करून सर्व पोर्तुगीज प्रजाजनांस कायद्याने सारखाच दर्जा दिला. हिंदूंचा समावेश मात्र या समानतेत करण्यांत आला नाही. जेसुइटांची हकालपट्टी इ. स. १७५९ तच झाली होती. इ. स. १७७४ त त्यांनी हद्दपार करविलेल्या एकंदर प्रजाजनांना परत येण्याचा हक्क मिळाला. तरीपण साऱ्या जुन्या काबिजादींत सुमारे दहा हजार पाद्री होतेच. इ. स. १७८३ त पोर्तुगीज मिनिस्टर मातीन्यु मेलु इ काश्त्रु यांनी गोव्यांतील पाद्रींना काबूत ठेवण्याबद्दल आर्चबिषपला कडक हुकूम देऊन पाद्री या पुढेही जर बेलगाम वागतील तर सरकार त्यांच्या साऱ्या संस्थाच बंद पाडील अशी धमकीही दिली होती. इ. स. १७८९ त जगप्रसिद्ध फ्रेंच राज्यक्रांति झाली व तिजमुळे झालेल्या नवमतप्रसाराने जोरजुलुमांतील पूर्वीचा आवेशही बराच कमी झाला होता. इ. स. १८१२ त इंकिझिसांवाचीच उचलबांगडी झाली. अर्थात्च ह्यापुढे आणखी जुलुम होण्याचे बंद पडले. इंकिझिसांव बंद होण्यास हा नवमतप्रसारच कारणीभूत झाला असावा. ह्या सहिष्णुतेच्या धोरणाने प्रेरित होऊनच व्हॉयसरॉय कोंद द रीयु पार्दु यांनी आर्चबिषपच्या विरोधास न जुमानतां मयें येथील सामान आणून पणजी येथे श्री महालक्ष्मीचे देऊळ बांधण्यास हिंदूंना परवानगी दिली. परंतु असल्या हुकुमांनी प्रभू येशू ख्रिस्ताची इतराजी होणार म्हणून ते पाद्रींनी पाळू नयेत असा उपदेश प्रत्यक्ष लेखी सरक्यूलर काढून आर्चबिषपनें केला. आणि इतक्यावरच न थांबतां, इ. स. १८३० त जुन्या काबिजादींत देवळे बांधू नयेत