पान:गोमंतक परिचय.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण तिसरें. करण्याचा मान, पॅव्होर शहराच्या बिषपला मिळाला. त्यांनी काढलेले उद्गार येथें देत आहों. __इंकिझिसांवाचा कारभार इतरत्रही लज्जास्पद रीतीने व बेअब्रकारक. पद्धतीनेच चालला होता, हे जरी खरे असले तरी, ऐहिक फायद्यासाठीच करण्यांत येणाऱ्या त्यांच्या हलकटपणास व निंदास्पदतेस गोव्यांत जसा ऊत आला होता, तसा तो इतर कोणत्याही ठिकाणी आला नव्हता. ज्या स्त्रिया तेथे त्यांच्या पापवासनांस बळी पडावयास तयार नसत, त्यांना आपल्या कैदेत ठेवून, त्यांच्याकडून आपली पाशवी वासना तृप्त करून, शेवटीं पाखंडी ठरवून त्यांनी जाळूनही टाकलें" ( A. Noronha Pg. 53) - हे उद्गार साध्या सभेत निघालेले नाहीत. तर सरकारी रीत्या प्रसिद्धपणे झालेल्या उत्सवांत निघालेले आहेत, व ते काढणारा हिंदू नसून ख्रिस्ती आहे, नव्हे पाद्री आहे, इतकेच नव्हे तर चर्चचा बिषपसारखा अधिकारी आहे. ह्या गोष्टीकडे वाचकांचे लक्ष्य खेचण्याची आम्ही परवानगी घेतों. - इ. स. १७४५ त गोव्याच्या आर्चबिषपनें असेंही फर्मान सोडले की, सासष्ट, बारदेश व तिसवाडी प्रांतांत, पोर्तुगीज न जाणणाऱ्या ख्रिस्त्यांची लग्नेच होऊ. नयेत. पोर्तुगीज शिकायला, ब्राह्मण व चाड्डे यांना सहा महिने व इतरांना एक वर्ष, अशा मुदती देण्यांत आल्या होत्या, परंतु पुढे लवकरच या हुकुमांतील मूर्खपणा लक्ष्यांत येतांच स्वतः आर्चबिषपनेंच तो रद्द केला. ___नवीन काबिजादींचा परिणाम:- इ. स. १७६३ त सोंधेकर राजांकडून अंतरूज व पंचमहाल (फोंडे, सांगें, केपें व काणकोण कोंसेल्य) तहान्वयें पोतुगीज सरकारकडे आले. आणि त्याबद्दल सोंधेकरांना २० हजार असफ्याचे वर्षासन ठरले.* ____ ह्या मुलखालाच नवीन काबिजाद असें नांव मिळाले. परलोकवासी विठ्ठल पारक्षराव वर्दै वालावलीकर या मुत्सद्याच्या प्रयत्नांमुळे, ह्या मुलुखांतील लोकांना पोतुगीजांनी आपापल्या चालीरीती व धर्म चालविण्याचा काल ता. ५ जून सन

  • हे वर्षासन तीस हजार रुपयांचे होते. असें श्री शांतादुर्गा संस्थानच्या इतिहासांत, माझे मित्र श्रीयुत विष्णु रंगाजी शेळडेंकर व मुकुंद सदाशिव श यांनी एका जुन्या लेखावरून उल्लेखिलें आहे. परंतु सरकारीरीत्या वीस हजारच असा होते असे दिसून येते.