पान:गोगलगाईचे पंख.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केले की पुन्हा जात नाहीत त्या व्यक्तीकडे. निरिक्षणाने मानवी चेहेरे वाचता येतात. देहबोली कळते. एखाद्याच्या हातून वारंवार चुका घडतात, त्याला रागे भरण्याआधी त्याच्या जागी मी असेल तर... हा विचार करा. दुसऱ्यांच्या भावना समजू शकाल तुम्ही. निसर्गाचं निरिक्षण करा. तुमच्यातलं कुतूहल, जिज्ञासा जागी ठेवा. ही सृष्टीची वेबसाइट उघडता आली तर ब्रम्हांडाचं ज्ञान, माहिती सहज मिळवता येईल. आता एवढं सगळं करायला वेळही भरपूर पाहिजे. स्टॅमिना पाहिजे. स्टॅमिना टिकवण्यासाठी आरोग्य चांगलं पाहिजे. वेळही वाचवता यायला हवा. मग टी. व्ही. बघणं, गेम खेळणं उगाचच लोळत राहणं हे टाळायलाच पाहिजे. आपल्यात जी बुद्धीमत्ता आहे तिचा जास्तीत जास्त वापर करायला शिका. पण कसं? खूप बाचा. तुम्हाला कळेल काय करायचं ते. पुस्तक हा आपला चांगला मित्र असतो, चांगला गुरू असतो, हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. म्हणून वाचणं गरजेचं आहे. वाचण्याला पर्याय नाही. खूप वाचा आणि हुशार व्हा. आता उपदेशाचा कंटाळा आला असेल ना? पण काय करू अजून सांगून संपलेलं नाही. माझ्या या कविता लिहिल्यावर मी त्या माझ्या मुलांना वाचायला देते. मुलं काही सूचना करतात. सकाळमधील 'चिंटू' हे सदर वाचतावाचता कितीतरी कविता सुचल्या आहेत. असं नेहमी सतर्क सजग राहिलं तर आपल्याला चांगलं काहीकाही सुचत राहतं. आपल्या हातून चांगलं काहीतरी झालं तर आयुष्य सार्थकी लागेल. चांगल्या, विधायक गोष्टीची चटक स्वतःला लावायची. वाईट गोष्टी आपोआप दूर पळतात. दोस्तांनो आपल्याला खूप काही करायचं असतं ना, तेव्हा दिवस भराभर संपतात. आयुष्य फार कमी आहे असं वाटतं. म्हणून वेळीच सावध होऊन वेळेचे महत्त्व जाणायला हवं. फुकट टाइमपास करायची सवय मोडायलाच हवी, नाही का? कामात बदल केल्याने मेंदूला विश्रांती मिळते. जेव्हा वाचून कंटाळा येतो तेव्हा शारीरिक काम करा जसं घरातली साफ सफाई, कपडे धुणं, भांडी घासणं, एखादा पदार्थ करणं. घरातलं कितीही काम केलं तरी संपत नाही. म्हणून कंटाळा येतो. आई उगाच चिडचिड करत नाही! मनापासून करत राहिलं तर त्याचीही गोडी सर्वोत्कृष्ट कला लागते. तरी घरातलं काम करावंसं वाटलंच नाही तर फिरायला जा. गाणी ऐका. गायन हीआहे. इतर वाद्येही वाजविता आली उत्तमच. आपल्याला खूपच बोअर व्हायला लागलेय आणि बाहेर जाणं अशक्य आहे. असतात ना अडचणी बाहेर, जसं, कडक ऊन असणं, बर्फ पडणं, खूप जोराचा पाऊस, वादळवारा असणं कर्फ्यू लागणं, बंद असणं, दंगे होणं असं कितीतरी कायकाय चाललेलं असतं आपल्या अवतीभवती, परिसरात, शहरात. अशा वेळी गायन, वादन, वाचन लेखन आपल्या उपयोगी पडते. गाण्याबजावण्यामुळे आपण दुसऱ्यांनाही आनंद देऊ शकतो, असं सारखं काहीना काही करत. शिकत राहा. स्वयंपाक ही कला तर आपल्या जगण्याशी निगडीत आहे. छानसा पदार्थ करून खायला घातला तर एखाद्याचं मन जिंकता येतं. रिडींग, रायटींग, कुकींग या गोष्टी आपल्याला यायलाच हव्यात. यात मुलगा- मुलगी भेद न करता शिका. परिस्थिती जेवढी प्रतिकूल तेवढं आपलं शिकणं जास्त. बुद्धीला धार जास्त. मग आपली बुद्धी उठेलही झळाळून. चंदन ओलं करून उगाळलं की सुगंध बाहेर