पान:गोगलगाईचे पंख.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोस्तांनो, मनोगत मला वाटतं, आपल्यापेक्षा जे वयाने छोटे आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करावे. जे माझ्यासाठीही आवश्यक असतं, जसं मुलांना घेऊन बागेत जाणं हे मुलांप्रमाणे मोठ्यांनाही आवश्यकच असतं! परंतु मुलांच्या निमित्ताने बागेत जाणं घडतं एवढंच. तर काय, काहीतरी करण्यांमुळे आपल्या सर्वांचेच काही क्षण आनंदी, उत्साही होतील. मोठी माणसं नेहमीच उपदेश करतात मग जाम कंटाळा येतो नाही? पण हेच गमतीजमतीनं हसतखेळत सांगितलं तर मजा येते, असं आपलं मला वाटतं. आजची मुलं खूप हुशार, चतुर म्हणजे स्मार्ट, टॅलेंटेड वगैरे आहेत. सगळं कळतं हे तुम्हा मुलांना! पण हुशारी, प्रतिभा, टॅलेंट टी. व्ही. पुढे बसून, सतत गेम खेळून गंजवू नका. लागलात ना बोअर व्हायला । असं काही कोणी सांगायला लागलं की चिडून उलटंच करावंसं वाटतं. आलं लक्षात. तरीपण चांगल्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. हे वाढत्या वयाचं लक्षण आहे. काय करणार! तुमचं आयुष्य सुंदर व्हावं असं सारखं वाटतं, आणि मग सांगितल्याशिवाय राहवत नाही. - छोट्या दोस्तांनो, एकदा मतिमंदांच्या शाळेत जाऊन पाहा, म्हणजे कळेल आपल्याला, निसर्गाने दिलेलं हे बुद्धीचं लेणं किती अनमोल आहे. रिमांड होम, अनाथाश्रम इथल्या मुलांना भेटून, गप्पा मारा त्यांच्याशी. मग तुम्ही वडीलधान्या माणसांवर नाराज होणार नाही. मोठी माणसं जे सांगतात ते आपल्या हितासाठीच आहे, हे तुम्ही समजून घ्याल. केव्हातरी मुक-बधीर, अंध अपंग मुलांशी बोला. शक्य झालं तर दोस्ती करा त्यांच्याशी. मग जाणवेल तुम्हाला धडधाकट शरीराची श्रीमंती या दैवी देणग्या जपाव्या लागतात. त्यांचे संवर्धन करावे लागते, हे नक्कीच उमजेल तुम्हाला. कष्टाने भाग्य उजळते हे तुम्हाला याआधीच माहित आहे. आणखी सांगण्याची काय जरुरी आहे? तुम्ही एकविसाव्या शतकातील जिज्ञासू मुलं आहात. उज्ज्वल भारताचे नागरिक आहात. आपल्या मातृभुमीचे भाग्यविधाते आहात. मग काय ठरवलंत ना? रोज नेमानं व्यायाम करायचा. सारखं सारखं टी. व्ही. पुढे न बसता अवांतर वाचन करायचं. पुस्तक वाचण्यामुळे ध्वनीप्रदुषण, हवाप्रदूषण होत नाही. दुसऱ्यांना त्रास न देता आपण वेगळ्या दुनियेत सफर करू शकतो. चांगले लेखन आपल्याला भावते, आवडते, मनात रुतून बसते. मेंदूत. ठसून बसते. मग आपला मेंदू आपोआपच तसा विचार, मनन, चिंतन करायला लागतो. मग आपल्यालाही सुचू लागते. आपल्या मनातले भाव तरल भावना, खळबळ, राग, द्वेष हे व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द माहीत असायला हवेत. शब्दांच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला वाचनामुळेच कळतात. वाचनामुळे मेंदूत शब्द फिड होतात. हव्या त्या वेळी हवे शब्द जिभेवर सहजतेने येतात. यासाठी वाचनाला पर्याय नाही. पुस्तकांबरोबर मानवी चेहेरेही वाचायला शिका. हे मात्र तुम्हाला दुसरे कोणी शिकवणार नाही. तुमचे तुम्हालाच शिकावे लागेल. चेहेरे वाचण्याची कला उपजतच असते. छोट्या, निरागस मुलांचे निरिक्षण करा. त्यांना लगेच कळते कोण रागीट- खडूस आहे, कोण प्रेमळ - मायाळू आहे. हिडीसफिडीस 8