पान:गोगलगाईचे पंख.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पडतो. तसे आपले विचार कारूण्यात भिजवून परिस्थितीच्या सहानेवर घासावेत. मुलांनो, फारच बोअर व्हायला लागले ना? जाऊ द्या, माफ करा. तुम्हाला एक आठवण सांगते (लिहिते). माझे गाव ( माहेर) बारामती तालुक्यातील मेखळी हे आहे. मेखळीत आमचा खूप जुना वाडा आहे. वाड्याचं छत पत्र्याचं आहे. उतरत्या पत्र्यालगत कमी उंचीवर सोपा (पडवी) आहे. त्याच्याशेजारी तुळशीवृंदावन आहे. सोप्याच्या पत्र्यावर चढून जायचं असलं की तुळशीवृंदावनावर पाय ठेवून, लहानथोर वर जायचे. बायका वाळवण वगैरे घालायच्या. आम्ही मुले, काही खेळ, पतंग उडवणे यासाठी जायचो.माघ महिन्यात प्रथमेपासून ते सप्तमी ( रथसप्तमी ) पर्यंत सूर्यनारायणाचे उपवास करतात. माझी आई, चुलती, वहिनी, शेजारी पाटलाचा वाडा आहे. त्यांच्या वाड्यातील कमलमामी, पुष्पामावशी या सर्वांचे सूर्यनारायणाचे व्रत असायचे. पाटलाचा वाडा कौलारू असल्याने त्यावर फारसं काही काम करता यायचं नाही. मग मामी आणि मावशी आमच्या पत्र्यावर यायच्या. रोज तांबडं फुटताना अंघोळ करून, पूजेची तयारी करून आम्ही पत्र्यावर जायचो. आम्हा लहान मुलींचे व्रत नसायचे तरी आम्हाला ते फार आवडायचे, म्हणून आम्ही जायचो. पूर्वेकडे आभाळ केसरी, जांभळट गुलाबी, लाल अशा रंगांची उधळण करत असे. रेडिओवर सात पाचच्या बातम्या सुरू झाल्या की पूर्वेकडे आकाशात लालतांबूस सूर्याचा गोंडा हळूहळू वर यायचा. सूर्याचा केसरी ठिपका दिसला की, पुष्पामावशी म्हणायची, 'आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे बातम्या देत आहेत.' असं म्हणून हसायची. आणि तेच रेडिओवर रिपीट व्हायचे. तर असे ते सात दिवस उत्साहाचे असायचे. रथसप्तमीदिवशी सूर्याचा रथ काढून त्यावर छोट्या गुंडगीतून दूध ऊतू घालवायचे. गुंडगी गरम करण्यासाठी चुलीतला विस्तव रथाजवळ ठेवायचा गुंडगी गरम झाली की त्यात दूध घालायचे ते शक्यतो पूर्वेकडे ऊतू जाईल तर शुभ मानायचे. म्हणून मग ती गुंडगी पूर्वेकडे कलती ठेवायची. मग दूध तिकडेच सांडायचे. रोज तांबडं फुटलं की दिवसाचा आरंभ होत असे. आता उंच इमारतीमुळे सूर्योदयाचे दर्शन दुर्मीळ झालंय. म्हणूनच हे लहानपणीचे 'तांबडं फुटणं' मनातून जात नाही. एकविसाव्या शतकाचा आरंभ म्हणूनही 'तांबडं फुटलं' असं पुस्तकाला नाव दिलं आहे. दुसरी सुधारीत आवृत्ती काढायचं ठरल्यावर नावही बदलावं म्हटलं. मुलांना आवडेल, रुचेल असं नाव द्यावं वाटलं. हे नाव तुम्हाला वेगळं वाटेल, अशी अपेक्षा आहे. मित्रांनो काहीही शंका आल्यास, सूचना करावीशी वाटल्यास, काहीही सांगावंसं वाटल्यास पत्र पाठवा, फोन, अथवा मेल करा. सावित्री जगदाळे पवन- डी- ५०५, डीएसके विश्व. सिंहगड रस्ता, धायरी, पुणे - ४११०४१ Mo.-9765988993 / E-mail: sj91087@gmail.com

  • 10