पान:गोगलगाईचे पंख.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राणाची बाजी लावूनी लढविली खिंड बाजीने लगीन ठेवूनी बाजूला कोंढाणा लढविला तानाजीने मानला एकेक मावळा मोठा गडाहूनी रयतेला लावला जीव लेकरावाणी आली संकटामागूनी संकटे किती तरी नाही डगमगले छत्रपती नाही कुणाची त्यांना वाटली भीती सावध राहीले समजूनी साऱ्या वैऱ्याच्या राती तह करताना गड किल्ले अनेक सोडले संधी मिळताच प्रदेश पुन्हा जिंकले शत्रुला केली पळता भुई थोडी गनिमी काव्याने जिरविली त्यांची खोडी अफजलखानाचा वाघनख्यांनी काढला कोथळा चकवूनी सिद्दीला सोडला पन्हाळा लाल महालातल्या खानाची कापली बोटे पळाला दिल्लीला हा मामा घेऊनी हात थोटे निसटले राजे फकीरांना वाटूनी आग्याचे पेठे लुटले सुरतेचे खजिने सोन्या - मोहरांचे साठे 81