पान:गोगलगाईचे पंख.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरोघरीचे संवाद आहेत. 'मस्त भाजी' या कवितेत मुलांच्या मनातील भाजी तुम्ही छानच उघड केली आहे. सावित्रीताई. काही काही कवितांमधून मात्र तुमची बालकवी ही भूमिका अलगद सुटून जात आहे आणि तुम्ही मोठ्यांच्या राज्यात सहजी प्रवेश करत आहात. असे वाटते. मुलांना न झेपणा-या तरल संवेदना... त्या कितीही चांगल्या असल्या तरी . तुमच्या कवितेतून मोठ्या प्रमाणात डोकावतात. उदा: 'गारवा' ही संपूर्ण कविता. ही कविता काव्यसौदर्यानं ओथंबलेली आहे पण मुलांना ती पेलेल का ? गारव्यात झुले मनाचा झुला / पानापानात घुमे गार वारा... अशा कल्पना मुलांना पेलतील ? तीच गोष्ट काही शब्द आणि संकल्पना या संज्ञा याबाबतची, कोंबडी हा पक्षी मुलांना आवडतो. पण त्याच्या डोईवरच्या तु-याचे वर्णन करताना त्याला कलात्मक हा शब्द तुम्ही योजला आहे. मुलांना सुंदरता समजते पण कलात्मकता समजण्याचे त्याचे वय नसते. संत गाडगेबाबांचे वर्णन करताना, 'मनाचे साधुत्व' जनकल्याणार्थ खर्च आयुष्य, त्यांच्या भावात ज्ञानाचे अखंड पाझर, वाहतात तृषार्ताकडे घ्या ओंजळीने भरभरून... अशा संज्ञा तुम्ही देत आहात मुलांना या संज्ञा व त्यामागील अर्थ संकल्पना पेलणार आहेत का ? अशा कविता या बालगीतसंग्रहात विशोभित दिसतात. तुमच्या या कवितासंग्रहाची अनेक बलस्थाने आहेत. पहिलं बलस्थान म्हणजे या संग्रहाच्या रूपाने मुलांना हाती माहितीचा खजिना लागणार आहे! पक्षी, प्राणी, वस्तू, स्थळे यांबाबत खूप माहिती आहे. दुसरं बलस्थान म्हणजे वर्तमानातील प्रतिमांचे संयोजन तुम्ही या कवितांमध्ये उत्तम रितीने केले आहे! उदा: 'आजीच्या वेळी' या कवितेत ... काय दिवस आलेत बाई/ सगळीकडेच रांगा न् पाळी... यावेळी पाहुणे होते. आता कुत्र्यांची सरबराई चालते..... तिसरं बलस्थान म्हणजे निसर्ग चित्रण ! अनेक कवितांमध्ये निसर्गाची विविध रुपे रंगरंगोटीसह रंगवली आहेत, चौथे बलस्थान म्हणजे बालसुलभ विषयांची शिंपण आणि गुंफण ! तुम्हाला बालमन चांगले वाचता येते, याचा जागोजागी प्रत्यय येतो. या कविता संग्रहाचे स्वागत शिक्षक, पालक, बालक, मुलांच्या क्षेत्रात काम करणा-या संस्था, ग्रंथालये यांनी अवश्य करावा अशी मी शिफारस करतो कारण असं लेखन वाचूनच आपली मनं समृद्ध होणार आहेत. वाचनाचे बालमनावर संस्कार होणार आहेत. बालवाचक प्रगल्भ होणार आहे. मराठी वाचणा-या प्रत्येक मुलाने हे पुस्तक वाचावे असं माझं मत आहे. या पुस्तकात चित्रेही आहेत. ती रंगवावीत. बालमनाच्या कल्पनेला रंगीबेरंगी गोगलगायीसारखे पंख फुटतील. तुमचं हे काव्यशिल्प 'गोगलगायीचे पंख' वाचकांसाठी सादर करतो. डॉ. न. म. जोशी 7