पान:गोगलगाईचे पंख.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उठा उठा S रे जुनाट कोषातून बाहेर पडू बुरसटल्या लक्ष्मणरेषा ओलांडू क्षितीज नवे धुंडाळू कल्याणाचा मार्ग चोखाळू उठा आनंदाने आपण जगू निराशेचा अंधार संपवू पहाट आशेची लागेल डोकावू नवविचारांचे किरण लागले उजळू उठा आनंदाने आपण जगू सत्याला जाऊन भिडू दाहकतेचे घोट घेऊ ते कडू नको अडचणीचे हे रडू उठा आनंदाने आपण जगू आत्मशक्ती आणखी वाढवू धैर्याचे शस्त्र परजू संकटांचे पर्वत परतवू उठा आनंदाने आपण जगू अभिरुची संपन्न करू माणुसकीचं नातं सर्वांशिकवू भेदभावाची दरी संपवू उठा आपण आनंदाने जगू 79