पान:गोगलगाईचे पंख.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लेकीची दहावी आली गं बाई दहावी आली लेक माझी अभ्यासात बुडाली टी. व्ही. सिनेमा न्हाय बघायचा खेळ न्हायी न्हाय फिरायचं नुसतं पुस्तकात डोकं खुपसायचं कामाचं तर नावच न्हाय घ्यायचं जादा तास आणि शिकवण्या चाचणी परिक्षांच्या पाठशिवण्या दिवस तिला पुरत न्हाय रातीची नीट झोपत न्हाय कर कर करते घोकंपट्टी सोडविते प्रश्नपत्रिकांची थप्पी दहावी आली गं दहावी आली लेक माझी अभ्यासात बुडाली 76