पान:गोगलगाईचे पंख.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सणासुदीचा वर्षाव वसंत बहरला आंबा मोहरला चैत्रगौरीच्या पन्ह्याचा थंडावा निराळा वैशाख वणव्यात गाव गाव फुलले जत्रायात्रांतून नात्यागोत्यांचे भेटले वळीवांच्या सरींनी मृदगंध दरवळा लग्न वाजंत्रींनी आसमंत निनादला जेष्ठातल्या लग्न वराती लाडू जिलेबीने पोट आले वरती आषाढात कोसळले आभाळ झाली धरती न्हाऊन निर्मळ ओल्या श्रावणी गंधाने झाली धुंद चिपकले हिरवाईचे वस्त्र हिरवं कंच दुथडी भरून धावतेय नदी सागर भेटीची तिला ओढी निंबा पिंपळाला पंचमीचे झुले नवतीचा पिंगा हिंदोळ्यावर घुमे पानाफुलांच्या मखरात मंगळागौर रंगे आघाडा हरळीने गौर गणपती सजे सणासुदीचा वर्षाव मनामनात हर्ष ओल्या हिरव्या ताजच्यात सरते वर्ष 1333 73