पान:गोगलगाईचे पंख.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वप्नाळू डोळ्यांचा दादा आम्हीच आपले रोज शिकतो इथे खेळतो इथेच खातो झोपतो बाहेरचं कोणी येत नाही नाही कुठे जात आम्हीही लग्न वाढदिवस बारशी ठाऊक नसते आम्हा काहीही एक दिवस असा उजाडला कोणी स्वप्नाळूपणा डोळ्यात लेवून आला आमच्यासाठी नवीन चेंडू आणला खूप मजेने खेळला पोटभर गप्पा मारल्या असं वाटलं... हा आमच्यातच राहिला तर... रे जाताना म्हणाला दादाच रे तुमचा पुन: पुन्हा येईन येताना काय आणू सांगा 'फुटबॉल' सर्वांचा एकच आवाज लाथा हाणायच्या होत्या परिस्थितीवर अन् उगवणाऱ्या दिवसावर रोज वाट बघणं सुरूच आहे .... स्वप्नाळू डोळ्यांचा दादा फुटबॉल घेऊन नक्कीच येईल ...नक्कीच.... मग खूप खेळायचं.... खूप... खूप... खेळायचं... सुधारूनच या सुधारगृहातून जायचं 72